मुंबई : मुंबई इंडियन्सच्या मालकीणबाई नीता अंबानी यांनी मंगळवारी संघातील नव्या सदस्यांचे स्वागत केले. यावेळी अर्थात या सत्रात मुंबईकडून खेळणाऱ्या युवराज सिंगवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. युवीसह यावेळी पंजाबचा अनमोलप्रीत सिंग आणि बरींदर सरण यांचेही स्वागत करण्यात आले. मुंबई इंडियन्सने याची घोषणा ट्विटरवर केली.
इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2019) 12व्या हंगामाला 23 मार्चला सुरूवात होणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (आधीचे दिल्ली डेअरडेव्हिल्स) यांच्याशी होणार आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या युवराजच्या कामगिरीच्या सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी युवीही तितकाच उत्सुक आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलसाठी युवराजही कसून तयारी करत आहे.
आयपीएलच्या लिलावात मुंबई इंडियन्सने सहा खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. यात लसिथ मलिंगाचे पुनरागमन झाले. त्याशिवाय बांगलादेशचा मुस्ताफिजूर रहमानचाही समावेश आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये जेतेपद पटकावले आहे.
मुंबई इंडियन्सचे सामने कधी व कोणाशी? 24 मार्च मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स मुंबई28 मार्च रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स बंगळुरू30 मार्च किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स मोहाली3 एप्रिल मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज मुंबई