Join us  

IPL 2020 : रोहित शर्मासह Mumbai Indiansच्या खेळाडूंची पुन्हा झाली कोरोना टेस्ट; पाहा व्हिडीओ

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) 13व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी अवघे सहा दिवस राहिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 2:56 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) 13व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी अवघे सहा दिवस राहिले आहेत. IPL 2020च्या पहिल्या सामन्यात ( Opening Match)  गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) भिडणार आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटामूळे यंदाची आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे प्रत्येक संघांना कोरोना व्हायरसच्या नियमांचं काटेकोर पालन कराव लागत आहे. सोमवारी मुंबई इंडियन्सच्या (MI) खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. MIने कोरोना चाचणी करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

IPL 2020मध्ये 'Purple Cap'च्या शर्यतीत पाच दावेदार; कोण मारेल बाजी? 

IPL 2020च्या पहिल्या सामन्यापेक्षाही चर्चा रंगलीय 'या' सुंदरीची; पाहा फोटो

दुबईत दाखल झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) दोन खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील 11 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीनंतर त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पण, या घटनेनंतर BCCIनं कोरोना व्हायरसचे नियम अधिक कठोर केले. संपूर्ण आयपीएल 2020 दरम्यान बीसीसीआयनं 20 हजार कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी BCCI कोट्यवधी खर्च करणार आहेत.

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) हे दोन संघ अबु धाबी येथील शेख जायेद क्रिकेट स्टेडियमवर सराव करत आहेत. दुबईत दाखल झाल्यापासून खेळाडूंची सातत्यानं कोरोना चाचणी केली जात आहे. मुंबई इंडियन्सच्या (MI) अधिकृत ट्विटर व इस्टाग्राम हँडलने खेळाडूंची बायो-बबलमध्ये कशी कोरोना चाचणी केली जाते, याबाबतची माहिती दिली आहे. या व्हिडीओत बुर्जी मेडिकल सिटीचे डायरेक्टर ऑपरेशन डॉक्टर पंकज चावला यांनी सर्व माहिती दिली.

पाहा व्हिडीओ  

मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians Team for IPL 2020) रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान. 

जाणून घ्या मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक ( Mumbai Indians Schedule, IPL 2020 )

19 सप्टेंबर - शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी23 सप्टेंबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी28 सप्टेंबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई1 ऑक्टोबर, गुरुवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी4 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी 3.30 वाजल्यापासून, शारजाह6 ऑक्टोबर, मंगळवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी11 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी16 ऑक्टोबर, शुक्रवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी18 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई23 ऑक्टोबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह25 ऑक्टोबर, रविवार - राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी28 ऑक्टोबर, बुधवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी31 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई3 नोव्हेंबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शाहजाह 

टॅग्स :आयपीएल 2020मुंबई इंडियन्सरोहित शर्माकोरोना वायरस बातम्या