टीम बाँडिंगसाठी Mumbai Indians चा संघ अलिबागला पोहोचला, पण रोहित शर्मा यात नाही दिसला

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ IPL 2024 मध्ये खेळणार आहे. पण,

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 01:21 PM2024-03-20T13:21:14+5:302024-03-20T13:21:38+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians players reach Alibaug for team bonding exercise before IPL 2024, but Rohit Sharma missing, Video | टीम बाँडिंगसाठी Mumbai Indians चा संघ अलिबागला पोहोचला, पण रोहित शर्मा यात नाही दिसला

टीम बाँडिंगसाठी Mumbai Indians चा संघ अलिबागला पोहोचला, पण रोहित शर्मा यात नाही दिसला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Mumbai Indians players in alibaug ( Marathi News ) : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे व्यग्र वेळापत्रक सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचे खेळाडू टीम बाँडिंगसाठी अलिबागला पोहोचले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ IPL 2024 मध्ये खेळणार आहे. पण, अजूनही रोहित शर्माच्या चाहत्यांना हा निर्णय पटलेला नाही. कर्णधार म्हणून पहिल्याच पत्रकार परिषदेत जेव्हा हार्दिकला हिटमॅनबाबत प्रश्न विचारले गेले, तेव्हा त्याचा चेहराही पडलेला दिसला. फ्रँचायझीच्या निर्णयानंतर रोहितसोबत बोलणं झालं नसल्याचेही त्याने कबुल केले. त्याचवेळी मुंबई इंडियन्सने पोस्ट केलेल्या व्हिडीओतही रोहित व हार्दिक हे अंतर ठेवून बसल्याचे दिसले. आता MI च्या टीम बाँडिंग दौऱ्यावरही रोहित न दिसल्याने कुछ तो गडबड है अशी चर्चा सुरू झाली आहे.


मुंबई इंडियन्सचे सर्व खेळाडू काल गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने अलिबागला गेले. हार्दिक पांड्या, इशान किशन यांच्यासोबत मुंबईचे सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य होते. पुढील काही दिवस हे सर्व अलिबागमध्येच एन्जॉय करणार आहेत आणि तेथून मुंबईत परत येऊन अहमदाबादच्या दिशेने रवाना होणार आहेत. तेथे त्यांचा पहिला सामना २०२२च्या विजेत्या गुजरात टायटन्सविरुद्ध आहे. पण, अलिबागमध्ये जेव्हा मुंबई इंडियन्सचे खेळाडू दाखल झाले, तेव्हा त्यात रोहित शर्मा दिसला नाही. हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्ताने असा दावा केला आहे. 


रोहितसह जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, डेवॉल्ड ब्रेव्हिस हेही अलिबागमध्ये दाखल झालेल्या खेळाडूंसोबत दिसले नाहीत. त्याचवेळी तिलक व डेवॉल्ड वानखेडेवर कसून सराव करत असल्याचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने पोस्ट केला आहे.  हार्दिक, इशानसह टीम डेव्हिड, रोमारिओ शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर व मोहम्मद नबी अलिबागमध्ये दाखल झालेल्या खेळाडूंमध्ये दिसत आहेत. सोबत मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर, लसिथ मलिंगा व किरॉन पोलार्ड हेही होते.  


 
सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्याला मुकणार...
मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्याला मुकणार हे निश्चित झालं आहे.  डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ट्वेंटी-२० सामन्यात सूर्यकुमारला पाय मुरगळला होता आणि त्याला माघार घ्यावी लागली होती. नुकतेच त्याच्यावर हर्नियासाठी शस्त्रक्रिया झाली आणि तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) तंदुरुस्तीवर मेहनत घेतोय. त्याला एनसीएने अद्याप तंदुरुस्त घोषित केलेले नाही. पण, लवकरच तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होईल.  

Web Title: Mumbai Indians players reach Alibaug for team bonding exercise before IPL 2024, but Rohit Sharma missing, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.