Rohit Sharma Press Conference : सूर्यकुमारची दुखापत, वर्कलोड अन् Mumbai Indiansची Playing XI यावर रोहित शर्माचे रोखठोक मत; Hardik Pandya बाबत मोठं विधान 

Mumbai Indians Press Conference : इंडियन प्रीमिअर लीगची ( IPL) सर्वाधिक पाच जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सची बुधवारी पत्रकार परिषद पार पडली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 01:22 PM2022-03-23T13:22:19+5:302022-03-23T13:32:08+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians Press Conference : Surya is at NCA, I want to play all games, Hardik had a huge impact and played a big role in our success, Say Rohit Sharma  | Rohit Sharma Press Conference : सूर्यकुमारची दुखापत, वर्कलोड अन् Mumbai Indiansची Playing XI यावर रोहित शर्माचे रोखठोक मत; Hardik Pandya बाबत मोठं विधान 

Rohit Sharma Press Conference : सूर्यकुमारची दुखापत, वर्कलोड अन् Mumbai Indiansची Playing XI यावर रोहित शर्माचे रोखठोक मत; Hardik Pandya बाबत मोठं विधान 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mumbai Indians Press Conference : इंडियन प्रीमिअर लीगची ( IPL) सर्वाधिक पाच जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सची बुधवारी पत्रकार परिषद पार पडली. कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) व मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी रोहित शर्माने IPL 2022च्या दृष्टीने अनेक महत्त्वांच्या मुद्यांवर आपले परखड मत मांडले. यावेळी रोहितने मुंबई इंडियन्सच्या नव्या संघासह सूर्यकुमार यादवची उपस्थिती, हार्दिक पांड्याची महत्त्वाची भूमिका यावर आपले मत व्यक्त केले.

सूर्यकुमार यादव अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही आणि त्यामुळे तो पहिल्या सामन्याला खेळण्याची शक्यता फार कमी आहे. मुंबई इंडियन्सने ताफ्यात रिटेन केलेल्या खेळाडूंपैकी सूर्यकुमार यादव हा एक आहे.  त्यामुळे तो मुंबईसाठी खूप महत्त्वाचा फलंदाज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत दुखापत झाली होती आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली होती. रोहित म्हणाला, सूर्यकुमार यादव सध्या NCA मध्ये आहे आणि तो आमच्या कॅम्पमध्ये येण्याची आम्ही वाट पाहतोय. NCA कडून परवानगी मिळताच तो कॅम्पमध्ये दाखल होईल.'' 

रोहितने यावेळी आयपीएलचे साखळी सामने महाराष्ट्रात होत असल्याचा फायला मुंबई इंडियन्सला होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. ''आमचा संघ नवीन आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सामने होत असल्याचा आम्हालाच फायदा होईल, असे वाटत नाही. या संघातील ७०-८० टक्के खेळाडू हे यापूर्वी मुंबईत कधी खेळलेलेच नाहीत,''असेही रोहितने स्पष्ट केले.

ओपनिंगला खेळणार का अन् वर्कलोडचं काय?
इशान किशनसोबत ओपनिंगला येणार असल्याचे रोहितने जाहीर केले. यावेळी वर्कलोडबाबत रोहित म्हणाला, मला सर्व सामने खेळायचे आहेत, म्हणूनच मी इथे आहे. मी सर्व सामने खेळणार आहे आणि प्रत्येक सामन्यात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहे. जर चिंतेची गोष्ट आढळलीच, तर आम्ही त्यावर मिळून तोडगा काढू.''

हार्दिक पांड्याबद्दल रोहित म्हणाला,''मुंबई इंडियन्सच्या यशात हार्दिकचा महत्त्वाचा वाटा आहे. आता तो नवी इनिंग्ज सुरू करतोय आणि ते त्याच्यासाठी नवं आव्हान आहे.  

प्लेइंग इलेव्हन बाबत

पाहा पूर्ण व्हिडिओ...

Web Title: Mumbai Indians Press Conference : Surya is at NCA, I want to play all games, Hardik had a huge impact and played a big role in our success, Say Rohit Sharma 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.