IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ पूर्वी बऱ्याच घडामोडी अजून घडायच्या बाकी आहेत... गुजरात टायटन्सला दोन पर्वात यश मिळवून दिल्यानंतरही हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) माजी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सकडे परतण्याचा निर्णय घेतला. पाचवेळच्या विजेत्या MI ने हार्दिकला ताफ्यात घेण्यासाठी १७ कोटी मोजलेल्या कॅमेरून ग्रीनला RCB कडे सोपवले. त्यानंतर गुजरात टायटन्ससोबत डिल पक्की झाली. हार्दिकच्या येण्याने तोच मुंबई इंडियन्सचा पुढील कर्णधार असेल, अशी चर्चा रंगली आणि त्यात जसप्रीत बुमराहच्या पोस्टने वादळ उठवले.
Jasprit Bumrah मुंबई इंडियन्सच्या हार्दिकला घेण्याच्या निर्णयावर नाखूश असल्याच्या चर्चा रंगल्या. जसप्रीतला रोहितनंतर कर्णधार बनायचे आहे, असेही म्हटले गेले. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये टेंशन वाढले होते. पण, आता मुंबई इंडियन्सनेच जसप्रीतबाबतचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने जसप्रीतचा फोटो पोस्ट केलाय आणि त्यावर जसप्रीतने पोस्ट केलेलाच कोट आहे... कधी कधी गप्प राहणेच हेच योग्य उत्तर असले, असे त्यावर लिहिले आहे.
IPL 2024 साठी मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, डेवॉल्ड ब्रेव्हिस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद यांना कायम राखले आहे. अर्जुन तेंडुलकरने मागील पर्वात आयपीएलमध्ये पदार्पण करताना ठिकठाक कामगिरी केली होती. तोही संघात कायम आहे. शॅम्स मुलानी, नेहाल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयुष चावला, आकाश माधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड ( ट्रेड लखनौ सुपरजायंट्स) यांना कायम राखले आहे.