Join us  

Mumbai Indians Kieron Pollard, IPL 2023: मुंबई इंडियन्सचा किरॉन पोलार्डला 'टाटा बाय-बाय'! ५ खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

CSK ने Ravindra Jadeja ला केलं रिटेन, पण 'या' ४ खेळाडूंना केलं OUT

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 4:40 PM

Open in App

Mumbai Indians Kieron Pollard, IPL 2023: भारतीय संघाचा T20 World Cup 2022 चा प्रवास सेमीफायनलमध्ये संपला. टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवाने भारतीय चाहत्यांची निराशा झाली. पण आता हळूहळू क्रिकेटरसिकांना IPL 2023 Mini Auctionचे वेध लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर IPL इतिहासातील सर्वात यशस्वी असलेल्या मु्ंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांनी आपल्या करारमुक्त खेळाडूंची यादी काऊन्सिलकडे सुपूर्द केली असल्याचे एक रिपोर्टनुसार सांगितले जात आहे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुंबई इंडियन्स संघाने आपला 'मॅचविनर' फलंदाज कायरन पोलार्ड याला करारमुक्त करत बाहेरचा रस्ता दाखवला असल्याची माहिती आहे. Ravindra Jadeja आणि CSK यांच्यातही वाद असल्याची चर्चा होती, पण जाडेजाला चेन्नईच्या संघाने कायम ठेवले आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या ५ खेळाडूंना यंदाच्या मिनी लिलावाच्या आधीच करारमुक्त केले आहे, तर CSK च्या संघाने आपल्या ४ खेळाडूंना करारमुक्त केले असल्याची माहिती रिपोर्ट्सनुसार देण्यात आली आहे. पॉवर-हिटर कायरन पोलार्डला संघातून करारमुक्त करण्याचा मुंबई इंडियन्सचा निर्णय धक्कादायक असल्याचे मानले जात आहे. पोलार्ड २०१०पासून मुंबईसोबत आहे. पाचही विजेतेपदाच्या संघात त्याचा समावेश होता. त्याने आतापर्यंत १३ हंगामात १४७च्या स्ट्राईक रेटने ३ हजार ४१२ धावा केल्या आहेत. मात्र IPL 2022 मध्ये पोलार्डला ११ सामन्यात केवळ १४४ धावाच करता आल्या. त्यात त्याचा स्ट्राइक रेटही १०७ होता. त्याचा संघाला फटका बसल्याने मुंबईने पोलार्डला करारमुक्त केल्याचे बोलले जात आहे.

मुंबईचा ५ खेळाडूंना 'टाटा बाय-बाय', १० खेळाडू रिटेन

मुंबईकडून टायमल मिल्स, फॅबियन एलन, हृतिक शोकीन, मयंक मार्कंडे आणि कायरन पोलार्ड यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पोलार्ड आणि मिल्स दोघे गेल्या हंगामात अपयशी ठरले. पण इतर तिघांना पुरेशी संधी मिळाली नाही. असे असले तरी आता या ५ जणांवर मिनी ऑक्शनमध्ये बोली लागणार आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, इशान किशन, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा आणि डॅनियल सॅम्स यांना संघात कायम ठेवल्याची माहिती आहे.

CSKने ४ खेळाडूंवर सोडले पाणी, ९ जण संघात कायम

चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपला कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासह रवींद्र जाडेजा, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस, मोईन अली आणि दीपक चहर या खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. तर इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस जॉर्डन, तामिळनाडूचा फलंदाज एन. जगदीशन, न्यूझीलंडचा स्पिनर मिचेल सँटनर आणि वेगवान गोलंदाज अॅडम मिल्न या चौघांना करारमुक्त केल्याची माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२आयपीएल लिलावमुंबई इंडियन्सकिरॉन पोलार्डचेन्नईरवींद्र जडेजा
Open in App