Join us  

Rohit Sharma Hardik Pandya, Mumbai Indians IPL 2025: हार्दिक पांड्या, रोहित शर्मा अन् मुंबई इंडियन्स... जयवर्धने हेड कोच होताच आकाश चोप्राची मोठी भविष्यवाणी

Rohit Sharma Hardik Pandya, Mumbai Indians IPL 2025 Retentions: गेल्या वर्षीच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा गट पडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:53 PM

Open in App

Rohit Sharma Hardik Pandya, Mumbai Indians IPL 2025 Retentions: टीम इंडियाने बांगलादेश विरूद्धची कसोटी आणि टी२० मालिका जिंकली. आता भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. पण याच दरम्यान आता क्रिकेटरसिकांना IPL 2025 साठीच्या लिलावाचेही वेध लागले आहेत. लवकरच आगामी स्पर्धेसाठी लिलाव सोहळा होईल. त्याआधी मुंबई इंडियन्सच्या संघाने दोन दिवसांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकन मार्क बाऊचरच्या जागी मुंबईने श्रीलंकेचा दिग्गज महेला जयवर्धने ( Mahela Jayawardene ) याला संघाचा मुख्य प्रशिक्षक केले. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयानंतर आता आकाश चोप्रा ( Aakash Chopra ) याने लिलावासंबंधी एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

"महेला जयवर्धने मुंबईच्या संघात परत आला आहे. गेल्या वर्षीपेक्षा काहीतरी बदल घडतायत हे दिसायला लागलं आहे. मला वाटतं आता मुंबई इंडियन्स लिलावाआधी त्यांची कोअर टीम म्हणजेच हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि तिलक वर्मा / इशान किशन यांना रिटेन करेल. त्यानंतर त्यांच्याकडे नेहाल वढेरा आहे. त्यांच्याकडे खूप पर्याय आहेत. त्यामुळे मला वाटतं की ते ५+१ रिटेन या फॉम्युलासह ७९ कोटी खर्चून लिलावात उतरतील. हे सर्व खेळाडू त्यांचा प्लेइंग ११ मधले असतील आणि सगळे भारतीय आहे. त्यामुळे उरलेल्या पैशात त्यांना इतर स्टार खेळाडूंवर बोली लावता येईल."

IPL चे नवीन नियम काय आहेत?

IPLच्या नव्या नियमानुसार, प्रत्येक संघ लिलावाआधी ५ आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि १ अनकॅप्ड (अद्याप आंतरराष्ट्रीय संघात न खेळलेला) खेळाडू संघात कायम ठेवू शकतात. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त १२० कोटी रुपयांची मर्यादा आहे. रिटेन केलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंपैकी पहिल्या खेळाडूला १८ कोटी, दुसऱ्या खेळाडूला १४ कोटी आणि तिसऱ्याला ११ कोटी द्यावे लागतील. पुन्हा चौथ्या खेळाडूसाठी १८ कोटी तर पाचव्या खेळाडूसाठी १४ कोटींची किंमत मोजावी लागेल. तसेच अनकॅप्ड भारतीय खेळाडूला रिटेन करण्यासाठी ४ कोटी मोजावे लागतील.

मुंबई इंडियन्सचे गणित

जर मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि तिलक वर्मा / इशान किशन यांना आणि त्यासोबत अनकॅप्ड नेहाल वढेराला रिटेन केले तर त्यांचे ७९ कोटी (१८+१४+११+१८+१४+४) लिलावाआधी खर्च होतील. म्हणजेच लिलावात जाताना मुंबईकडे १२० कोटींपैकी ४१ कोटी शिल्लक राहतील, त्यात त्यांना चांगले परदेशी गोलंदाज आणि ऑलराऊंडर विकत घ्यावे लागतील.

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सहार्दिक पांड्यारोहित शर्मासूर्यकुमार अशोक यादव