IPL 2018 : रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स जेतेपदाचा चौकार मारणार का?  

रोहत शर्माने मुंबई इंडियन्सला तिन्हीवेळा जेतेपद मिळवून दिलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 04:20 PM2018-04-04T16:20:45+5:302018-04-04T16:20:45+5:30

whatsapp join usJoin us
mumbai indians squad 2018, IPL 2018: Defending champions Mumbai Indians brace for stiff title defence, Analysis — Mumbai Indians — Strengths and Weaknesses | IPL 2018 : रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स जेतेपदाचा चौकार मारणार का?  

IPL 2018 : रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स जेतेपदाचा चौकार मारणार का?  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई -  मुंबई इंडियन्सच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक जेतेपद आहेत. रोहत शर्माने मुंबई इंडियन्सला तिन्हीवेळा जेतेपद मिळवून दिलं आहे.  2013, 2015 आणि 2017 च्या सत्रामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये मुंबईने चषकावर नाव कोरलं आहे.  त्यामुळं पुन्हा एकदा रोहित शर्माची जादू चालणार का? याकडे क्रिडाप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.  यावेळीदेखील आयपीएलच्या चषकावर नाव कोरत मुंबई इंडियन्स जेतेपदाचा चौकार मारण्यास तयार आहे. 

मुंबई इंडियन्सच्या चमूमध्ये यावेळी 25 खेळाडूंचा भरणा आहे. यामध्ये 8 परदेशी आणि 17 भारतीय खेळाडू आहेत.  यावर्षी बंगळुरु येथे झालेल्या लिलावात मुंबईने 22 खेळाडू विकत घेतले, तर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या तिघांना रिटेन करण्यात आले. जखमी जेसन बेहरनडोर्फच्या जागी न्यूझीलंडच्या मिचेल मॅकलेघनला संधी देण्यात आली आहे.   

बलस्थाने -  मुंबईचा संघ प्रत्येक सत्राप्रमाणे यावर्षीही संतुलीत दिसतोय. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये दिग्गजांचा भरणा आहे. मुंबईच्या संघामध्ये सात अष्टपैलू खेळाडूंचा खजिना आहे. कायरन  पोलार्ड, क्रुणाल पांड्या, बेन कटिंग, ड्यूमिनी सारखे अष्टपैलू खेळाडू संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावतील. त्याचप्रमाणे, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह सारखे भारतीय संघात असणारे खेळाडू आहेत. मुस्तफिजुर रेहमान डेथ ओव्हरमध्ये आपली कमाल दाखवू शकतो. 

कच्चा दुवा - फिरकी गोलंदाजी ही मुंबईची पडती बाजू ठरु शकते. 

यांच्याकडे असेल लक्ष - रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या या दोघांच्या खांद्यावर मुंबईची भिस्त असणार आहे. 

मुंबई इंडियन्स टीमचे फलंदाज - मुंबई इंडियन्सची बॅटींग लाईन ही टीमची सर्वात मोठी ताकद आहे. टीममध्ये सूर्यकुमार यादव, ईविन लुईस, सौरभ तिवारी, शरद लुंबा आणि सिध्देश लाडसारखे फलंदाज घेण्यात आले आहे. टीममध्ये ईशान किशन आणि आदित्य तारे हे दोन विकेटकीपर फलंदाज आहेत. 

मुंबई इंडियन्स टीमचे गोलंदाज - मुंबई इंडियन टीममध्ये गोलंदाजही चांगलेच धारदार आहेत.  जसप्रीत बुमराह, मुस्तफिजुर रहमान, पॅट कमिन्स, राहुल चहर, प्रदीप सांगवान,  अकिला धनंजया, मोहसिन खान आणि निधीष यांना संधी देण्यात आली आहे

Mumbai Indians Squad 2018, असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ - 

खेळाडूबेस प्राइससोल्ड प्राइस
रोहित शर्मारिटेन15 कोटी
हार्दिक पांड्यारिटेन11 कोटी
जसप्रीत बुमराहरिटेन7 कोटी
कायरन पोलार्ड2 कोटी5.40 कोटी
मुस्तफिजुर रहमान1 कोटी2.20 कोटी
पॅट कमिंस2 कोटी5.40 कोटी
सूर्य कुमार यादव30 लाख3.20 कोटी
क्रुणाल पांड्या40 लाख8.80 कोटी
इशान किशन40 लाख6.20 कोटी
राहुल चाहल20 लाख1.90 कोटी
एवलिन लुइस1.5 कोटी3.80 कोटी
सौरभ तिवारी50 लाख80 लाख
बेन कटिंग1 कोटी2.20 कोटी
प्रदीप सांगवान30 लाख1.50 कोटी
ड्यूमिनी1 कोटी1 कोटी
मिशेल मॅकलेघन 1 कोटी1.50 कोटी
तजिंदर ढिल्लन20 लाख55 लाख
शरद लुंबा20 लाख20 लाख
सिद्धेश लाड20 लाख20 लाख
आदित्य तारे20 लाख20 लाख
मयंक मारकंडे20 लाख20 लाख
अकिला धनंजय50 लाख50 लाख
अनुकूल रॉय20 लाख20 लाख
मोहसिन खान20 लाख20 लाख
निधीश एमडी20 लाख20 लाख

Web Title: mumbai indians squad 2018, IPL 2018: Defending champions Mumbai Indians brace for stiff title defence, Analysis — Mumbai Indians — Strengths and Weaknesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.