मुंबई - मुंबई इंडियन्सच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक जेतेपद आहेत. रोहत शर्माने मुंबई इंडियन्सला तिन्हीवेळा जेतेपद मिळवून दिलं आहे. 2013, 2015 आणि 2017 च्या सत्रामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये मुंबईने चषकावर नाव कोरलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा रोहित शर्माची जादू चालणार का? याकडे क्रिडाप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. यावेळीदेखील आयपीएलच्या चषकावर नाव कोरत मुंबई इंडियन्स जेतेपदाचा चौकार मारण्यास तयार आहे.
मुंबई इंडियन्सच्या चमूमध्ये यावेळी 25 खेळाडूंचा भरणा आहे. यामध्ये 8 परदेशी आणि 17 भारतीय खेळाडू आहेत. यावर्षी बंगळुरु येथे झालेल्या लिलावात मुंबईने 22 खेळाडू विकत घेतले, तर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या तिघांना रिटेन करण्यात आले. जखमी जेसन बेहरनडोर्फच्या जागी न्यूझीलंडच्या मिचेल मॅकलेघनला संधी देण्यात आली आहे.
बलस्थाने - मुंबईचा संघ प्रत्येक सत्राप्रमाणे यावर्षीही संतुलीत दिसतोय. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये दिग्गजांचा भरणा आहे. मुंबईच्या संघामध्ये सात अष्टपैलू खेळाडूंचा खजिना आहे. कायरन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, बेन कटिंग, ड्यूमिनी सारखे अष्टपैलू खेळाडू संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावतील. त्याचप्रमाणे, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह सारखे भारतीय संघात असणारे खेळाडू आहेत. मुस्तफिजुर रेहमान डेथ ओव्हरमध्ये आपली कमाल दाखवू शकतो.
कच्चा दुवा - फिरकी गोलंदाजी ही मुंबईची पडती बाजू ठरु शकते.
यांच्याकडे असेल लक्ष - रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या या दोघांच्या खांद्यावर मुंबईची भिस्त असणार आहे.
मुंबई इंडियन्स टीमचे फलंदाज - मुंबई इंडियन्सची बॅटींग लाईन ही टीमची सर्वात मोठी ताकद आहे. टीममध्ये सूर्यकुमार यादव, ईविन लुईस, सौरभ तिवारी, शरद लुंबा आणि सिध्देश लाडसारखे फलंदाज घेण्यात आले आहे. टीममध्ये ईशान किशन आणि आदित्य तारे हे दोन विकेटकीपर फलंदाज आहेत.
मुंबई इंडियन्स टीमचे गोलंदाज - मुंबई इंडियन टीममध्ये गोलंदाजही चांगलेच धारदार आहेत. जसप्रीत बुमराह, मुस्तफिजुर रहमान, पॅट कमिन्स, राहुल चहर, प्रदीप सांगवान, अकिला धनंजया, मोहसिन खान आणि निधीष यांना संधी देण्यात आली आहे
Mumbai Indians Squad 2018, असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ -
खेळाडू | बेस प्राइस | सोल्ड प्राइस |
रोहित शर्मा | रिटेन | 15 कोटी |
हार्दिक पांड्या | रिटेन | 11 कोटी |
जसप्रीत बुमराह | रिटेन | 7 कोटी |
कायरन पोलार्ड | 2 कोटी | 5.40 कोटी |
मुस्तफिजुर रहमान | 1 कोटी | 2.20 कोटी |
पॅट कमिंस | 2 कोटी | 5.40 कोटी |
सूर्य कुमार यादव | 30 लाख | 3.20 कोटी |
क्रुणाल पांड्या | 40 लाख | 8.80 कोटी |
इशान किशन | 40 लाख | 6.20 कोटी |
राहुल चाहल | 20 लाख | 1.90 कोटी |
एवलिन लुइस | 1.5 कोटी | 3.80 कोटी |
सौरभ तिवारी | 50 लाख | 80 लाख |
बेन कटिंग | 1 कोटी | 2.20 कोटी |
प्रदीप सांगवान | 30 लाख | 1.50 कोटी |
ड्यूमिनी | 1 कोटी | 1 कोटी |
मिशेल मॅकलेघन | 1 कोटी | 1.50 कोटी |
तजिंदर ढिल्लन | 20 लाख | 55 लाख |
शरद लुंबा | 20 लाख | 20 लाख |
सिद्धेश लाड | 20 लाख | 20 लाख |
आदित्य तारे | 20 लाख | 20 लाख |
मयंक मारकंडे | 20 लाख | 20 लाख |
अकिला धनंजय | 50 लाख | 50 लाख |
अनुकूल रॉय | 20 लाख | 20 लाख |
मोहसिन खान | 20 लाख | 20 लाख |
निधीश एमडी | 20 लाख | 20 लाख |