Join us

IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!

Gerald Coetzee, IND vs SA 4th T20: सामन्यात एका निर्णयावरून गेराल्ड कोईत्झे पंचांशी वाद घालताना दिसल्याने, त्याच्यावर ICCने कारवाई केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 11:00 IST

Open in App

Gerald Coetzee, IND vs SA 4th T20: जोहान्सबर्ग येथे भारताविरुद्ध चौथ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयाबाबत विचित्र वर्तणूक केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीला फटकारले. भारताने त्या सामन्यात २८३ धावा केल्या. तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या दोघांनी शतके ठोकत आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई केली. त्यातच पंचांनी एक चेंडू 'वाइड' घोषित केला. आधीच भारताने केलेल्या धुलाईमुळे त्रस्त असलेला कोएत्झी पंचांशी हुज्जत घालू लागला आणि त्याने पंचांवर अयोग्य टिप्पणी केल्याची घटना घडली. त्यामुळे ICC ने त्याला चांगलीच अद्दल घडवली.

ICC ने काय कारवाई केली?

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील चौथ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान, जेराल्ड कोएत्झीने खेळाडू आण सपोर्ट कर्मचाऱ्यांसाठी ICC आचारसंहिता 2.8 चे उल्लंघन केल्याचे आढळून आले, जे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान अंपायरच्या निर्णयावर असहमती दर्शविण्याशी संबंधित आहे. या प्रकरणात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाला फटकारण्यात आले आणि त्याच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट (निगेटिव्ह मार्किंग) जोडला गेला. गेराल्डशिवाय नेदरलँडचे स्कॉट एडवर्ड्स आणि ओमानचे सुफियान महमूद यांनाही आयसीसी आचारसंहितेच्या विविध कलमांतर्गत विविध सामन्यांसाठी फटकारण्यात आले.

गेराल्ड कोएत्झीने चूक कबूल केली

आयसीसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोएत्झीने आपली चूक कबुल केली आहे. एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनल ऑफ मॅच रेफ्रीच्या अँडी पायक्रॉफ्टने या प्रकरणी खेळाडूला शिक्षा केली. यापूर्वी मैदानावरील पंच अल्लाउद्दीन पालेकर आणि स्टीफन हॅरिस, तिसरे पंच लुबाबालो गाकुमा आणि चौथे पंच अर्नो जेकब्स यांनीही कोईत्झीवर गैरवर्तणुकीचे आरोप केले होते.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकातिलक वर्मासंजू सॅमसनद. आफ्रिकाआयसीसी