Join us  

WPL 2023: महिला प्रीमियर लीग तरुण मुलींना त्यांच्या स्वप्नासाठी प्रेरणा देईल - नीता अंबानी

nita ambani on wpl: सध्या महिला प्रीमियर लीगचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2023 5:32 PM

Open in App

Women’s Premier League । मुंबई : 4 मार्च रोजी डिवाय पाटील स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या (WPL) उद्घाटन सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) संघ मालक नीता अंबानी यांच्या उपस्थितीत चमकदार कामगिरी केली. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला. यामध्ये मुंबईच्या संघाने दणदणीत विजय मिळवला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबईने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी पराभव केला.

दरम्यान, महिला आणि पुरुष दोघेही स्टेडियममध्ये महिला क्रिकेटला सपोर्ट करताना पाहायला मिळाले. प्रत्येक चेंडूवर नीता अंबानी चीअर करत होत्या. अधिकाधिक महिला खेळाडूंना क्रिकेट खेळण्यासाठी आकर्षित करणे हा त्यांचा मानस आहे. सामन्यानंतर त्यांनी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना मार्गदर्शन केले. सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत नीता अंबानी म्हणाल्या की, डब्ल्यूपीएलचा पहिला दिवस हा एक अविस्मरणीय होता. खेळातील महिलांसाठी हा एक प्रतिष्ठित दिवस आणि एक प्रतिष्ठित क्षण आहे. WPL चा भाग बनणे खूप आंनदाची गोष्ट आहे.

WPL तरुण मुलींना त्यांच्या स्वप्नासाठी प्रेरणा देईल - नीता अंबानी महिला प्रीमियर लीगच्या स्पर्धेचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, " WPL मुळे अधिकाधिक महिलांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यास मदत होईल अशी आशा आहे. यामुळे देशभरातील तरुण मुलींना खेळात सहभागी होण्यासाठी, त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी  प्रेरणा मिळेल. स्टेडियममध्ये इतके लोक पाहून खूप आनंद झाला. आपल्या महिला संघाला पाठिंबा देण्यासाठी पुरुष आणि महिला दोघेही मोठ्या संख्येने बाहेर पडले. या उद्घाटन स्पर्धेसाठी मी सर्व संघांना शुभेच्छा देते." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगनीता अंबानीमुंबई इंडियन्सहरनमप्रीत कौरटी-20 क्रिकेट
Open in App