मुंबई इंडियन्सचे खेळाडू उद्या महिला संघाची जर्सी घालून मैदानावर उतरणार, टॉससाठी हरमनप्रीत कौर येणार

मुंबई : १६ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स वानखेडेवर एक अनोखा उपक्रम साजरा करणार आहे. ३६ NGO मधील १९००० पेक्षा जास्त मुली आणि २०० दिव्यांग मुलं हा सामना पाहण्यासाठी वानखेडेवर हजर राहणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 09:06 PM2023-04-15T21:06:39+5:302023-04-15T21:08:53+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians team will be wearing MI's WPL jersey on tommorow's match to inspire the girl child.What a great initiative and gesture by Mumbai Indians! | मुंबई इंडियन्सचे खेळाडू उद्या महिला संघाची जर्सी घालून मैदानावर उतरणार, टॉससाठी हरमनप्रीत कौर येणार

मुंबई इंडियन्सचे खेळाडू उद्या महिला संघाची जर्सी घालून मैदानावर उतरणार, टॉससाठी हरमनप्रीत कौर येणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : १६ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स वानखेडेवर एक अनोखा उपक्रम साजरा करणार आहे. ३६ NGO मधील १९००० पेक्षा जास्त मुली आणि २०० दिव्यांग मुलं हा सामना पाहण्यासाठी वानखेडेवर हजर राहणार आहे. रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स असा सामना होणार आहे. रिलायन्स फाऊंडेशन आणि मुंबई इंडियन्सच्या  एज्युकेशन अँड स्पोर्ट्स (ESA) फॉर ऑल या उपक्रमाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवला आहे. प्रत्येक हंगामात संघ MI अशा एका सामन्याचे आयोजन करते आणि त्यात शहरातील एनजीओच्या मुलांना स्टेडियमवर मॅच पाहण्यासाठी आणले जाते. MI vs KKR सामना ESA उपक्रमाचा भाग म्हणून मुलींना प्रेरणा देण्यासाठी समर्पित आहे.  

या उपक्रमाबद्दल बोलताना नीता अंबानी म्हणाल्या, “हा विशेष सामना म्हणजे क्रीडा क्षेत्रातील महिलांचा उत्सव आहे. या वर्षी पहिल्या महिला प्रीमियर लीगसह भारताच्या महिला क्रिकेटपटूंसाठी एक ऐतिहासिक सुरुवात झाली. मुलींच्या शिक्षण आणि खेळाच्या अधिकारावर प्रकाश टाकण्यासाठी, आम्ही या वर्षीचा ESA कार्यक्रम मुलींना समर्पित करत आहोत! या रविवारी स्टेडियममध्ये आयपीएल सामन्याचा थेट आनंद घेण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांमधून १९००० मुलींना घेऊन आल्याचा रिलायन्स फाऊंडेशनला अभिमान वाटतो.”

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघही महिला प्रीमिअर लीगमधील त्यांच्या संघाची जर्सी घालणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पहिली वहिली महिला प्रीमिअर लीग जिंकली होती. उद्याच्या सामन्यात रोहित शर्मासोबत नाणेफेक करायला हरमनप्रीत कौरही येणार आहे. 


 

Web Title: Mumbai Indians team will be wearing MI's WPL jersey on tommorow's match to inspire the girl child.What a great initiative and gesture by Mumbai Indians!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.