Join us  

IPL 2023: आला रे! Mumbai Indians च्या ताफ्यात ३ वर्षांनी स्टार खेळाडूचं 'कमबॅक'

गेल्या वर्षी RCB च्या संघात खेळला होता हा धमाकेदार क्रिकेटर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 7:53 PM

Open in App

Mumbai Indians, IPL 2023: टीम इंडियाचा T20 World Cup 2022 चा प्रवास सेमीफायनलमध्ये संपला. इंग्लंडने भारताला घरी पाठवून दिले. आता क्रिकेटरसिकांना IPL 2023 Mini Auctionचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर IPL इतिहासातील सर्वात यशस्वी असलेल्या मु्ंबई इंडियन्स करारमुक्त केलेल्या आणि संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी काऊन्सिलकडे सुपूर्द केली असल्याचे एक अहवालानुसार सांगण्यात येत आहे. मुंबई इंडियन्सने 'मॅचविनर' फलंदाज कायरन पोलार्ड याला करारमुक्त करत बाहेरचा रस्ता दाखवला असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईचे फॅन्स काहीसे नाराज आहेत. पण असे असतानाच या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणारी बातमी मुंबई इंडियन्सने दिली आहे. Jason Behrendorff हा स्टार खेळाडू मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे.

ऑस्ट्रेलियन डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेंडॉर्फ याला मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले असल्याची माहिती मुंबई इंडियन्सच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. तब्बल ३ हंगामांच्या नंतर जेसन पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून त्याला ट्रेडिंग करून मुंबईच्या संघात घेतला आहे. RCBने IPL 2022 मध्ये ७५ लाखांच्या मूळ किमतीत त्याला विकत घेतले होते. त्याआधी २०१८मध्ये तो मुंबई इंडियन्सच्या संघाकडून तर २०२१ला चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळला होता. आतापर्यंत त्याने ९ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळून ७ बळी घेतले आहेत. २१ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. मुंबईकडून खेळताना त्याने ५ सामन्यात ५ विकेट्स घेतल्या होत्या.

मुंबई इंडियन्सचा ५ खेळाडूंना 'टाटा बाय-बाय', १० खेळाडू रिटेन

रिपोर्ट्समधील माहितीनुसार, मुंबईच्या संघाने टायमल मिल्स, फॅबियन एलन, हृतिक शोकीन, मयंक मार्कंडे आणि कायरन पोलार्ड यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पोलार्ड आणि मिल्स दोघे गेल्या हंगामात अपयशी ठरले. पण इतर तिघांना पुरेशी संधी मिळाली नाही. असे असले तरी आता या ५ जणांवर मिनी ऑक्शनमध्ये बोली लागणार आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, इशान किशन, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा आणि डॅनियल सॅम्स यांना संघात कायम ठेवल्याची माहिती आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकिरॉन पोलार्ड
Open in App