IPL 2022 MI vs CSK: मुंबई इंडियन्सच्या सामन्याआधी CSKला आणखी एक मोठा धक्का; स्टार गोलंदाज स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता

चेन्नईचा दीपक चहरही याआधीच स्पर्धेतून बाहेर झाला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 08:08 PM2022-04-20T20:08:32+5:302022-04-20T20:09:35+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians vs CSK Big Blow to CSK as one more star bowler can be ruled out after Deepak Chahar IPL 2022 | IPL 2022 MI vs CSK: मुंबई इंडियन्सच्या सामन्याआधी CSKला आणखी एक मोठा धक्का; स्टार गोलंदाज स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता

IPL 2022 MI vs CSK: मुंबई इंडियन्सच्या सामन्याआधी CSKला आणखी एक मोठा धक्का; स्टार गोलंदाज स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 CSK vs Mumbai Indians: चेन्नई सुपर किंग्ज संघाचा यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचा प्रवास खूपच वाईट झाला. चार वेळा IPL ची ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नईच्या संघाने यंदाच्या मोसमात सहापैकी पाच सामने गमावले आहेत. आधी मेगालिलावात त्यांनी सर्वात मोठी रक्कम देऊन १४ कोटींना अष्टपैलू दीपक चहरला संघात घेतले. पण त्याला दुखापतीमुळे स्पर्धेतूनच बाहेर व्हावे लागले. त्यानंतर गोलंदाजीतील त्याची कमी जाणवतच राहिली आणि संघाने सहापैकी केवळ एकच सामना जिंकला. तशातच आता चेन्नईला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

चेन्नईच्या संघाने सलामीचे चार सामने हरल्याची ही IPL च्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. त्यानंतर पाचव्या सामन्यात चेन्नईने बंगलोर संघाला पराभूत केले. पण सहाव्या सामन्यात त्यांना पुन्हा एकदा गुजरात टायटन्सने पराभूत केले. दीपक चहरच्या अनुपस्थितीत संघाच्या गोलंदाजीतील धार कमी झाली आहे हे साऱ्यांनीच मान्य केले असताना आता आणखी एका गोलंदाजाला दुखापतीने ग्रासले असल्याची माहिती आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अँडम मिल्न (Adam Milne) याला पहिल्या सामन्यातच दुखापत झाली होती. मात्र त्यानंतर तो पुन्हा संघात खेळताना दिसला नाही. स्नायूंच्या दुखापतीमुळे त्याने पहिल्या सामन्यात केवळ २.३ षटकेच टाकली होती. त्यानंतर त्याला १४ दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. मात्र तो अजूनही पूर्णपणे तंदुरूस्त न झाल्याने तो स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

"मिल्न हळूहळू तंदुरूस्त होत आहे. पण तो पूर्णपणे फिट कधी होईल, याची अद्याप माहिती देता येऊ शकत नाही. अजून एक-दोन आठवडे जातील असं बोललं जातंय. आम्ही लवकरच कमबॅक करू अशी आम्हाला आशा आहे. संघ व्यवस्थापनाने स्पष्ट निर्देश दिले तरच आम्ही त्याच्या जागी दुसरा खेळाडू बदली करून संघात घेऊ शकतो. सध्या संघात दीपक चहरसारख्या गोलंदाजाची गरज आहे. आमच्याकडे सध्या भारतीय गोलंदाजाचा पर्याय उपलब्ध नसल्याने आम्ही अँडम मिल्नच्या तंदुरूस्तीची वाट पाहतोय", असे CSKच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले.

Web Title: Mumbai Indians vs CSK Big Blow to CSK as one more star bowler can be ruled out after Deepak Chahar IPL 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.