lsg vs mi 2023 । लखनौ : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनौ सुपर जायंट्स (MI vs LSG) असा सामना होत आहे. दोन्हीही संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. मुंबईचा संघ १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर तर १३ गुणांसह लखनौचा संघ चौथ्या स्थानी स्थित आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्हीही संघांसाठी 'करा किंवा मरा' असाच काहीसा असणार आहे. कारण आज पराभूत होणाऱ्या संघाच्या अडचणीत वाढ होईल, तर विजयी संघ प्लेऑफच्या दिशेने कूच करेल. लखनौच्या एकाना स्टेडियमवर या महत्त्वाच्या सामन्याचा थरार रंगणार आहे.
दरम्यान, लखनौच्या संघाने आजचा सामना गमावल्यास यजमान संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर देखील होऊ शकतो. कारण चेन्नईविरूद्धचा सामना रद्द झाल्यामुळे त्यांना एक गुण देण्यात आला होता. आता त्यांचे १५ गुण असून मुंबईचे १६ गुण आहेत. मुंबई इंडियन्सने आपल्या मागील सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सला पराभवाची धूळ चारली होती. यंदाच्या हंगामात दोन्हीही संघांनी प्रत्येकी १२-१२ सामने खेळले आहेत. रोहितच्या मुंबईला सात तर लखनौला सहा सामने जिंकण्यात यश आले आहे. मुंबई आणि लखनौ हे संघ आतापर्यंत केवळ दोनवेळा आमनेसामने आले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे दोन्हीही सामन्यांमध्ये लखनौच्या नवाबांनी मुंबईचा पराभव केला आहे. त्यामुळे मुंबईचा संघ मागील पराभवाचा वचपा काढणार का हे पाहण्याजोगे असेल.
किंग कोहली सहकाऱ्यांसोबत मोहम्मद सिराजच्या नवीन घरी; RCBच्या शिलेदारांनी वेधले लक्ष
मुंबई इंडियन्सचा संभावित संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, विष्णू विनोद, टिम डेव्हिड, कॅमरून ग्रीन, ट्रिस्टन स्टब्स, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, जेसन बेहरेनडोर्फ.
लखनौ सुपर जायंट्सचा संभावित संघ -
क्विंटन डिकॉक, कायल मेयर्स, कृणाल पांड्या, प्रेरक मांकड, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युद्धवीर सिंग चरक.
"पुढे जाऊन पुढच्या पिढीचे नेतृत्व कर...", 'शतकवीर' शुबमन गिलचे 'विराट' कौतुक
Web Title: Mumbai Indians vs Lucknow Super Giants is a do or die match in IPL 2023 today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.