Join us  

Kieron Pollard IPL 2022 : किरॉन पोलार्डचे 'शायनिंग' मारणे Mumbai Indiansला महागात पडले; Anuj Rawat ला जीवदान दिले, Video 

MI vs RCB : अनुज रावत व विराट कोहली यांनी ५२ चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली. रावतने ४७ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांनी ६६ धावांची खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 3:52 PM

Open in App

किरॉन पोलार्डच्या ( Kieron Pollard ) एका चूकीचा फटका  संपूर्ण मुंबई इंडियन्सला कालच्या लढतीत बसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचा नायक अनुज रावत ( Anuj Rawat) याला बाद करण्याची सोपी संधी पोलार्डसाठी चालून आली होती, पंरतु त्याने नको त्या वेळी नकोती शायनिंग मारली. ६६ धावांची मॅच विनिंग खेळी करणारा अनुज तेव्हा २७ धावांवर खेळत होता आणि जर तेव्हा त्याला बाद केले असते तर कदाचित सामन्याचा निकाल काही वेगळा लागला असता. ८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हा प्रकार घडला. 

रोहित शर्मा ( २६) व इशान किशन ( २६) यांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या, परंतु पुढील २९ धावांत त्यांच्या ६ विकेट्स पडल्या. सूर्यकुमार यादवने ७व्या विकेटसाठी जयदेव उनाडकतसह ४१ चेंडूंत ७२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने  ६८ धावा चोपल्या. जयदेव १३ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी मुंबईला ६ बाद १५१ धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात अनुज रावत ( Anuj Rawat ) आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी  ८ षटकांत ५० धावा फलकावर चढवल्या. रावत व विराट कोहली यांनी ५२ चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली. रावतने ४७ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांनी ६६ धावांची खेळी केली. विराटने ३६ चेंडूंत ५ चौकारांसह ४८ धावा केल्या.   

मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूकडून ( RCB) पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सचा हा सलग चौथा पराभव ठरल्याने MI चाहते निराश झाले आहेत.  मुंबई इंडियन्सने विजयासाठी ठेवलेले १५२ धावांचे लक्ष्य बंगळुरूने ७ विकेट्स व ९ चेंडू राखून सहज पार केले.  अनुज रावतने ४७ चेंडूंत ६६ धावांची मॅच विनिंग खेळी केली आणि त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. ८व्या षटकात रावतने मारलेला चेंडू मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या हातात गेला आणि फॅफ व तो एक धाव घेण्यासाठी धावले. पोलार्ड नॉन स्ट्रायकर एंडला गेला आणि अनुजला रन आऊट करण्याची सोपी संधी चालून आली होती. पण... 

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :आयपीएल २०२२किरॉन पोलार्डमुंबई इंडियन्स
Open in App