Join us  

बाप्पाच्या साक्षीनं MI नं दिली मोठी हिंट; या खास 'फ्रेम'मध्ये दडलंय रोहितवरील 'प्रेम' अन् बरंच काही

या पोस्टच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सनं मेगा लिलावाआधीचा डावच उघड केल्याचे दिसते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 1:32 PM

Open in App

आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्सनं आपल्या चाहत्यांना गणेशोत्सवाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक मराठी सणाला MI फ्रेंचायझी संघ सोशल मीडियावरुन चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसते. चाहत्यांसोबत खास कनेक्शन दाखवणाऱ्या यावेळीच्या पोस्टमध्ये खूप खास गोष्ट दडली आहे. या पोस्टच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सनं मेगा लिलावाआधी खेळणारा डावच उघड केल्याचे दिसते. 

रोहितसाठी पाण्यासारखा पैसा ओतायला तयार आहेत फ्रँचायझी

आयपीएल २०२४ च्या हंगामात मुंबईच्या संघात खांदे पालट झाली. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची कॅप्टन्सी हार्दिक पांड्याकडे गेली. चाहत्यांमध्येही या गोष्टीचा संतप्त सूर उमटल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आगामी आयपीएलमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याची चर्चाही रंगू लागली होती. रोहित शर्माला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी अमुक संघ एवढी मोठी रक्कम खर्च तयार करायला तयार आहे, अशा आशयाच्या बातम्या देखील चर्चेत आहेत. पण बाप्पाच्या साक्षीनं  मुंबई इंडियन्सनं या सर्व चर्चा फोल असल्याचे संकेत देत मोठी हिंट दिली आहे. 

पण मुंबई इंडियन्सनं त्याला साडायला हवं ना!

तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा, या कॅप्शनसह  मुंबई इंडियन्सच्या संघाने एक खास फोटो शेअर केला आहे. AI च्या माध्यमातू तयार करण्यात आलेल्या या फोटोमध्ये मुंबई इंडियन्सच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडूंची झलक पाहायला मिळते. भारतीय महिला संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौरसह सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा या फोटोत दिसतात. मुंबई इंडियन्स आगामी आयपीएल लिलावाआधी या खेळाडूंना रिटेन करणार असावी, अशी हिंट यातून मिळते. याशिवाय रोहित हा सर्वांचा प्रमुख आहे, अशी झलकही तुम्हाला या फोटोत पाहायला मिळेल. जे तो पुन्हा कॅप्टन्सीच्या रुपात दिसू शकतो याचे संकेत आहेत. 

मुंबई इंडियन्सनं ठरवलंय? फक्त अधिकृतरित्या पुष्टी बाकी असं चित्र

आयपीएलच्या आगामी लिलावाआधी किती खेळाडूंना रिटेन करता येणार याबाबतची नियमावली अद्याप स्पष्ट झालेली नाही. पण ही संख्या ४ च्या पुढेच असणार आहे. मुंबई इंडियन्सनं शेअर केलेल्या फोटोत रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या ही मंडळी रिटेन खेळाडूंच्या यादीत असल्याचे संकेत मिळतात. याशिवाय या फोटोत आणखी एका व्यक्तीचे फक्त हात दिसताहेत, ती व्यक्ती बुमराह असावी? असे वाटते. मुंबई इंडियन्सनं कोणत्या खेळाडूंना रिटेन करायचं हे निश्चित केले आहे. फक्त अधिकृतपणे त्याची माहिती समोर येे बाकी आहे.

टॅग्स :मुंबई इंडियन्सरोहित शर्माहार्दिक पांड्यासूर्यकुमार अशोक यादवनीता अंबानी