Irani Cup 2024 : ३ बळी! मुकेश कुमारनं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला; रहाणे-अय्यरवर मोठी जबाबदारी

mumbai vs rest of india : इराणी चषकात मुंबई विरुद्द शेष भारत यांच्यात लढत होत आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 12:33 PM2024-10-01T12:33:37+5:302024-10-01T12:37:00+5:30

whatsapp join usJoin us
mumbai vs rest of india live score Mukesh Kumar dismisses Prithvi Shaw, Ayush Mhatre and Hardik Tamore | Irani Cup 2024 : ३ बळी! मुकेश कुमारनं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला; रहाणे-अय्यरवर मोठी जबाबदारी

Irani Cup 2024 : ३ बळी! मुकेश कुमारनं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला; रहाणे-अय्यरवर मोठी जबाबदारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

mumbai vs rest of india live score | लखनौ : इराणी चषक २०२४ मध्ये आजपासून मुंबई आणि शेष भारत यांच्यात लढत होत आहे. शेष भारतचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ही लढत लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर पार पडत आहे. प्रथम गोलंदाजी करताना शेष भारतने चांगली पकड बनवली. पहिल्या सत्रापासून मुकेश कुमारने मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावण्यास सुरुवात केली. त्याने पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे आणि हार्दिक तमोरे या त्रिकुटाला तंबूत पाठवण्याचे काम केले.

देवदत्त पडिक्कलने पृथ्वी शॉचा अप्रतिम झेल घेऊन मुंबईला पहिला झटका दिला. त्यानंतर लयमध्ये दिसत असलेला म्हात्रे बाद झाला. तर हार्दिक तमोरेला खातेही उघडता आले नाही. २० षटकांत मुंबईने तीन बाद ६० धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांच्यावर डाव सावरण्याची मोठी जबाबदारी आहे.

मुंबईचा संघ -
अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, हार्दिक तमोरे, श्रेयस अय्यर, मोहित अवस्थी, शार्दुल ठाकूर, जुनैद खान, एस एन खान, शम्स मुलानी, तनुष कोटियन.

शेष भारतचा संघ - 
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईस्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, इशान किशन, मानव सुथार, सारंश जैन, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल.

Web Title: mumbai vs rest of india live score Mukesh Kumar dismisses Prithvi Shaw, Ayush Mhatre and Hardik Tamore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.