Join us

Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला

mumbai vs rest of india : सर्फराज खानचे शानदार द्विशतक.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 16:05 IST

Open in App

mumbai vs rest of india live score | लखनौ : पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात शेष भारतने सामन्यात पकड बनवल्यानंतर मात्र त्यांच्या मनासारखे काहीच झाले नाही. सुरुवातीला मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर या जोडीने शेष भारत संघाला घाम फोडला. रहाणे ९७ धावांवर बाद झाला. पण, त्यानंतर सर्फराज खानने संकटमोचक बनत मुंबईची लोकल सुस्साट पळवली. सर्फराजने शानदार द्विशतक झळकावताना प्रतिस्पर्धी संघाला सळो की पळो करुन सोडले. खराब सुरुवातीनंतर मुंबईच्या संघाने शानदार पुनरागमन करत शेष भारतविरुद्ध चमक दाखवली. 

अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीनंतर सर्फराज खानने शतक झळकावले. त्याने १४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले, तो इथेच न थांबता २०० च्या आकड्यापर्यंत पोहोचला. इराणी चषक २०२४ मध्ये मंगळवारपासून मुंबई आणि शेष भारत यांच्यात लढत सुरू झाली आहे. शेष भारतचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ही लढत लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर पार पडत आहे.

सर्फराज खानने २३ चौकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २५३ चेंडूत २०० धावा करुन आपले द्विशतक पूर्ण केले. सर्फराजने प्रथम श्रेणी किकेटमध्ये १५ शतके तर १४ अर्धशतके झळकावली आहेत. मुंबईकडून श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे आणि त्यानंतर सर्फराज खानने चांगली खेळी केली. सर्फराजला तनुष कोटियनने (६४) चांगली साथ देताना तब्बल १८३ धावांची भागीदारी नोंदवली.

मुंबईचा संघ -अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, हार्दिक तमोरे, श्रेयस अय्यर, मोहित अवस्थी, शार्दुल ठाकूर, जुनैद खान, सर्फराज खान, शम्स मुलानी, तनुष कोटियन.

शेष भारतचा संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईस्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, इशान किशन, मानव सुथार, सारंश जैन, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल. 

टॅग्स :सर्फराज खानमुंबईअजिंक्य रहाणे