Join us  

Prithvi Shaw : पृथ्वी शॉनं कर्णधार म्हणून रचला इतिहास, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाच्या साथीनं जिंकलं जेतेपद

Mumbai won Vijay Hazare title 2021; Prithvi Shaw मुंबईनं रविवारी अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश संघावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला आणि चौथ्यांदा विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare title 2021) स्पर्धेचे जेतेपद नावावर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 4:53 PM

Open in App

Mumbai won Vijay Hazare title 2021: मुंबईनं रविवारी अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश संघावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला आणि चौथ्यांदा विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare title 2021) स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. उत्तर प्रदेशनं विजयासाठी ठेवलेलं ४ बाद ३१२ धावांचे लक्ष्य मुंबईनं ४१.३ षटकांत ४ बाद ३१५ धावा करून पार केलं.     ( Mumbai vs Uttar Pradesh) दुखापतग्रस्त असूनही कर्णधार पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) मैदानावर फलंदाजीला आला अन् वादळासारखा घोंगावला. त्याच्या आक्रमक खेळीनंतर आदित्य तरेनं ( Aditya Tare) नाबाद शतकी खेळी करून मुंबईला जेतेपद जिंकून दिलं. मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) तरेनं नाबाद ११८ धावा केल्या. पृथ्वीनं ३९ चेंडूंत ७३ धावा चोपल्या. Mithali Raj : दोन सामने, दोन वर्ल्ड रेकॉर्ड; कॅप्टन मिताली राजनं उंचावली भारतीयांची मान!

प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेश संघानं ४ बाद ३१२ धावांचा डोंगर उभा केला. माधव कौशिक यानं १५६ चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारासह १५८ धावा केल्या. समर्थ सिंग ( ५५) आणि अक्ष दीप नाथ ( ५५) यांच्या अर्धशतकानं उत्तर प्रदेशला मोठा पल्ला गाठून देण्यात हातभार लावला. दरम्यान, क्षेत्ररक्षण करताना मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ ( Mumbai Captain Prithvi Shaw) याला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावं लागलं. आतापर्यंत दमदार फॉर्मात असलेल्या पृथ्वीला दुखापत झाल्यानं मुंबईचं टेंशन वाढलं होतं, परंतु तो मैदानावर उतरला अन् वादळा सारखा घोंगावला. Prithvi Shaw : पृथ्वी शॉ याची आणखी एक वादळी खेळी; नोंदवला विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांनाही न जमलेला विक्रम 

पृथ्वीनं ३९ चेंडूंत १० चौकार व ४ षटकार खेचून ७३ धावांची वादळी खेळी केली. शिवम मावीनं त्याला बाद केलं. पण, या खेळीच्या जोरावर पृथ्वीनं इतिहास रचला. विजय हजारे ट्रॉफीच्या एका पर्वात ८०० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्यानं ८ सामन्यांत १६५.४० च्या सरासरीनं ८२७ धावा. त्यानं १ द्विशतक, ३ शतकं आणि १ अर्धशतक झळकावली. २०१८मध्ये पृथ्वीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप उंचावला होता आणि आज त्याच्याच नेतृत्वाखाली मुंबईनं विजय हजारे ट्रॉफी जिंकली. २१ वर्षीय पृथ्वी हा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप व विजय हजारे ट्रॉफी जिंकणारा पहिलाच खेळाडू आहे. ( Prithvi Shaw becomes the first captain to win both U-19 World Cup and Vijay Hazare Trophy ) 

टॅग्स :पृथ्वी शॉविजय हजारे करंडकमुंबई इंडियन्स