Rohit Sharma Team India at CM Eknath Shinde Varsha Bungalow: कॅरेबियन बेटांवर रंगलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने फायनलच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. भारताने या विजयासह तब्बल १३ वर्षांनी वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघ वरचढ ठरला. १७ वर्षांनी पुन्हा एकदा टी२० विश्वचषकाची ट्रॉफी भारतात आली. भारतीय संघाने ही ट्रॉफी गुरुवारी मायदेशात आणली. दिल्लीत आल्यावर संघाचे खेळाडू आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. त्यानंतर संध्याकाळी मुंबईत विजय मिरवणुकीत सहभागी झाले. कालच्या जंगी सोहळ्यानंतर आज मुंबईकर खेळाडू असलेले कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चौघांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी सत्कार झाला.
'जगज्जेत्या' मुंबईकरांचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सत्कार!
भारतीय संघात समावेश असलेले चार खेळाडू हे देशांतर्गत स्पर्धांमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळतात. कर्णधार रोहित शर्मा, फलंदाज सूर्यकुमार यादव, अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे यांनी वर्ल्डकपमध्ये भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर युवा यशस्वी जैस्वाल याचाही संघात समावेश होता. या चार खेळाडूंनी आज दुपारी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत वर्ल्ड चॅम्पियन्सचा सत्कार करण्यात आला.
Web Title: Mumbaikar Cricketers World Champions Rohit Sharma Shivam Dube Suryakumar Yadav Yashasvi Jaiswal are honored at CM Eknath Shinde Varsha Bungalow
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.