मुंबईकर जेमिमाची भारतीय संघात निवड, महिला क्रिकेट संघाची घोषणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या दौ-यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली असून १७ वर्षांची मुंबईकर युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स हिची निवड झाली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:57 PM2018-01-10T23:57:18+5:302018-01-10T23:57:25+5:30

whatsapp join usJoin us
Mumbaikar Jemima selected for the Indian team, Women's Cricket team announced | मुंबईकर जेमिमाची भारतीय संघात निवड, महिला क्रिकेट संघाची घोषणा

मुंबईकर जेमिमाची भारतीय संघात निवड, महिला क्रिकेट संघाची घोषणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या दौºयासाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली असून १७ वर्षांची मुंबईकर युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स हिची निवड झाली आहे. गेल्या काही काळामध्ये देशांतर्गत सामन्यांमध्ये केलेल्या धडाकेबाज आणि सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ जेमीमाला मिळाले आहे. बुधवारी ‘बीसीसीआय’ने मुंबईत १६ सदस्यांच्या महिला क्रिकेट संघाची घोषणा केली.
या मालिकेचा आयसीसी महिला चॅम्पियनशीपमध्ये (२०१७-२०२०) समावेश करण्यात आला असून ही मालिका १० फेब्रुवारीपर्यंत खेळविण्यात येईल. सध्या भारताचा पुरुष संघ दक्षिण आफ्रिका दौºयावर असून महिलांचा आफ्रिका दौरा २ फेब्रुवारीपासून सुरु होईल. या दौ-यासाठी भारताच्या नेतृत्त्वाची धुरा मिताली राजकडे कायम ठेवण्यात आली असून उपकर्णधारपदाची जबाबदारी हरमनप्रीत कौरकडे सोपविण्यात आली आहे.
या दौ-यामध्ये भारत - दक्षिण आफ्रिका दरम्यान ५ फेब्रुवारीपासून ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. परंतु, त्याआधी या दोन्ही संघामध्ये २ फेब्रुवारीला एक सराव सामनाही होईल. विशेष म्हणजे एकदिवसीय सामन्यांनंतर दोन्ही देशांमध्ये पाच सामन्यांची टी२० मालिकाही खेळविण्यात येणार असल्याची माहिती ‘बीसीसीआय’कडून मिळाली.

‘पूनमनेच दिली आनंदाची बातमी’
भारतीय क्रिकेट संघात जेमिमाची निवड झाल्याचे कळाल्यानंतर आमच्या घरामध्ये सर्वांनाच आनंदाश्रू अनावर झाले. तिने घेतलेल्या कठोर मेहनतीचे फळ तिला मिळाले. जेमिमाची सिनिअर खेळाडू पूनम राऊत हिनेच आम्हाला जेमिमाच्या निवडीची बातमी सर्वप्रथम सांगितली,’ अशी प्रतिक्रीया जेमिमाचे वडिल आयवन रॉड्रिग्स यांनी ‘लोकमत’कडे दिली.
आयवन यांनी पुढे म्हटले की, ‘अनेक सामन्यांमध्ये जेमिमा आणि पूनम यांनी मुंबईसाठी सलामी दिली आहे. त्यामुळे दोघींचा खेळ चांगल्याप्रकारे ओळखून आहेत. पूनमसोबत असल्याने जेमिमाला कोणतीही अडचण येणार नाही.’ त्याचप्रमाणे, ‘आतापर्यंत ज्या वरिष्ठ खेळाडूंविरुद्ध जेमिमा खेळली, आता त्यांच्याचबरोबर ती डेÑसिंग रुम शेअर करणार, याचा जास्त आनंद आहे.
जेमिमाला राज, हरमनप्रीत कौर, गोस्वामी, कृष्णमूर्ती यांसारख्या खेळाडूंकडून खूप शिकण्यास मिळेल,’ असेही आयवन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

वनडे मालिका
२ फेब्रुवारी : सराव सामना (ब्लूमफाँटेन)
५ फेब्रुवारी : पहिल सामना (किम्बर्ले)
७ फेब्रुवारी : दुसरा
सामना (किम्बर्ले)
१० फेब्रुवारी
: तिसरा सामना
(पॉचेफस्ट्रम)

भारतीय महिला संघ:
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), सुषमा वर्मा, एकता बिश्त, स्मृती मानधना, पूनम यादव, पूनम राऊत, राजेश्वरी गायकवाड, जेमिमा रॉड्रिग्स, झूलन गोस्वामी, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, मोना मेश्राम, पूजा वस्त्रकार, वेदा कृष्णामूर्ती आणि तानिया भाटिया (यष्टीरक्षक).

Web Title: Mumbaikar Jemima selected for the Indian team, Women's Cricket team announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.