कोलकाता : गेल्या तीन वर्षांपासून मुंबई इंडियन्सविरुद्ध सातत्याने पराभव स्वीकारणाऱ्या यजमान कोलकाता नाईटरायडर्सला बुधवारी येथे आपल्या या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पराभवाची मालिका खंडित करीत गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत करण्याची संधी आहे.केकेआरने आतापर्यंत आयपीएलच्या ११ मोसमांमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध २१ सामने खेळले असून त्यापैकी १७ सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. कुठल्याही आयपीएल संघाची एका प्रतिस्पर्ध्याविरुद्ध ही सर्वांत निराशाजनक कामगिरी आहे.वानखेडे स्टेडियममध्ये ६ मे रोजी झालेल्या लढतीत केकेआर १३ धावांनी पराभूत झाले होते. मुंबईविरुद्ध हा त्यांचा सलग सातवा पराभव ठरला. त्यांनी मुंबईविरुद्ध अखेरचा विजय ८ एप्रिल २०१५ रोजी मिळवला होता. केकेआरने लय गमावली असून मुंबईला योग्य वेळी सूर गवसला आहे. यापूर्वी २०१५ मध्येही मुंबईने अखेरच्या ८ पैकी ७ सामन्यांत विजय मिळवत जेतेपद पटकावले होते. यावेळीही मुंबई त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास प्रयत्नशील आहे. उभय संघांना साखळी फेरीत अद्याप चार-चार सामने खेळायचे आहेत, पण केकेआरने पाच, तर मुंबईने चार विजय मिळवले आहे. बुधवारी पराभूत होणाºया संघाचा पुढील मार्ग खडतर होईल. (वृत्तसंस्था)केकेआरला पराभवाचे दुष्टचक्र भेदण्यासाठी सुनील नरेनला फलंदाजी व गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करावी लागेल. शरीरातील पाण्याची मात्रा कमी झाल्यामुळे नरेनला गेल्या लढतीत खालच्या फळीत फलंदाजी करावी लागली. रॉबिन उथप्पाने गेल्या लढतीत अर्धशतकी खेळी करीत पुनरागमन केले. त्यामुळे केकेआरची मधल्या फळीची चिंता काही अंशी कमी झाली असेल. नरेनला अन्य गोलंदाजांकडून विशेषता वेगवान गोलंदाजांकडून चांगली साथ लाभणे आवश्यक आहे. अनुभवी मिचेल जॉन्सन व टॉम कुरेन महागडे ठरले आहेत. स्नायूच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर मर्यादा आल्या आहेत. दुखापतग्रस्त असल्यामुळे शिवम मावी गेल्या लढतीत खेळला नव्हता. त्याच्या पुनरागमाची उत्सुकता आहे.रोहित शर्मा मुंबई संघाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ आहे, पण नरेनविरुद्ध तो विशेष यशस्वी ठरलेला नाही. नरेनने त्याला सहा वेळा बाद केले आहे. मुंबईचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने गेल्या लढतीत फलंदाजी व गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली होती. या लढतीतही मुंबई संघाला हार्दिककडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. बेन कटिंग गेल्या लढतीत महागडा ठरला होता. त्यामुळे यावेळी मुंबई संघ त्याच्या स्थानी मुस्ताफिजुर रहमानला अंतिम ११ खेळाडूंत स्थान देऊ शकते.वेळ : रात्री ८ वाजतास्थळ : इडन गार्डन्स स्टेडियम, कोलकाता
- Cricket Buzz»
- बातम्या»
- मुंबईकर सातत्य कायम राखण्यास उत्सुक, केकेआर वचपा काढण्यास सज्ज
मुंबईकर सातत्य कायम राखण्यास उत्सुक, केकेआर वचपा काढण्यास सज्ज
गेल्या तीन वर्षांपासून मुंबई इंडियन्सविरुद्ध सातत्याने पराभव स्वीकारणाऱ्या यजमान कोलकाता नाईटरायडर्सला बुधवारी येथे आपल्या या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पराभवाची मालिका खंडित करीत गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत करण्याची संधी आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 1:18 AM