ऋषभ पंतचा शेजारी ठरला मुंबईचा ‘हीरो’

उत्तराखंड राज्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळून या राज्याचे प्रतिनिधित्व करणारा आकाश आयपीएलमधील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 05:51 AM2023-05-25T05:51:07+5:302023-05-25T05:51:21+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai's 'Hero' became Rishabh Pant's neighbor, madhwal | ऋषभ पंतचा शेजारी ठरला मुंबईचा ‘हीरो’

ऋषभ पंतचा शेजारी ठरला मुंबईचा ‘हीरो’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई इंडियन्सचा हीरो ठरलेला आकाश मढवाल हा मूळचा दिल्लीचा असून तो स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचा शेजारी आहे. सुरुवातीला केवळ टेनिस चेंडूने क्रिकेट खेळणाऱ्या आकाशने वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत लेदर चेंडूने क्रिकेट खेळले नव्हते. २०१९ सालच्या या निवड चाचणीमध्ये त्याची गोलंदाजी गुणवत्ता हेरली ती उत्तराखंडचे तत्कालीन प्रशिक्षक वसीम जाफर आणि विद्यमान प्रशिक्षक मनीष झा यांनी. येथून सुरू झाला आकाशचा शानदार प्रवास.

उत्तराखंड राज्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळून या राज्याचे प्रतिनिधित्व करणारा आकाश आयपीएलमधील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. यंदा बुमराहच्या जागी त्याची निवड झाल्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र, लखनौविरुद्ध निर्णायक मारा करत आकाशने आपली उपयुक्तता सिद्ध केली. गेल्या वर्षीही सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून मढवालची मुंबई संघात निवड झाली होती.

हरिद्वार जिल्ह्यातील रुडकी येथील रहिवासी असलेला मढवाल हा पंतचा शेजारी असून तो अभियांत्रिकीचा पदवीधर आहे. पंतने ज्यांच्या हाताखाली क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवले, त्या अवतार सिंग यांच्याच मार्गदर्शनाखाली मढवालनेही क्रिकेटचे धडे घेतले.

Web Title: Mumbai's 'Hero' became Rishabh Pant's neighbor, madhwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.