Suved Parkar Mumbai Team Ranji Trophy: रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांमध्ये मुंबईकर खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळत आहे. तशातच २१ वर्षीय सुवेद पारकरने मुंबई आणि उत्तराखंड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात इतिहास रचला. सुवेदने पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक झळकावत स्वतःचे प्रशिक्षक अमोल मजुमदार यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. उत्तराखंड विरुद्ध खेळल्या जात असलेल्या या सामन्यात सुवेद पारकरने २१ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने तुफानी खेळी केली. परंतु एका मोठ्या विक्रमासाठी त्याला अवघ्या ९ धावा कमी पडल्या.
९ धावांमुळे हुकला मोठा विक्रम
सुवेदने तब्बल ४४७ चेंडूत खेळून २५२ धावा कुटल्या. रणजी ट्रॉफीमध्ये बाद फेरीत पदार्पण करताना द्विशतक झळकावणारा सुवेद पारकर हा दुसरा खेळाडू ठरला. सुवेदच्या आधी रणजी क्रिकेटपटू अमोल मजुमदारने १९९४ मध्ये हरयाणाविरुद्ध २६० धावा केल्या होत्या. आता २८ वर्षांनंतर अमोल मजुमदार मुंबई संघाचे प्रशिक्षक असताना सुवेद पारकरने आपल्या कोचच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण सुवेदने आणखी ९ धावा केल्या असत्या, तर २६१ धावांसह तो रणजी ट्रॉफीमध्ये बाद फेरीत पदार्पण करताना सर्वाधिक धावा करणारा मुंबईकर फलंदाज ठरू शकला असता.
प्रथम श्रेणी पदार्पणात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या-
३४१ - साकिबुल गनी (२०२२)२६७* - अजय रोहेरा (२०१८)२६० - अमोल मजुमदार (१९९४)२५६* - बहीर शाह (२०१७)२५२ - सुवेद पारकर (२०२२)२४० - एरिक मार्क्स (१९२०)
प्रथम श्रेणी सामन्यातील पदार्पणातील सर्वोच्च धावसंख्येबद्दल बोलायचे झाले तर हा विक्रम साकिबुल गनीच्या नावावर आहे. त्याने एकाच सत्रात ३४१ धावा कुटल्या होत्या.