सिमन्सचा झेल पकडताना बंगळुरूचा खेळाडू वरूण अरॉन.
मुंबईला दि्वशतकी धावसंख्या गाठून देण्यात महत्त्वाची कामगिरी लेंडल सिमन्सने बजावली. सिमन्सने 59 धावा केल्या.
पार्थिव पटेलला बाद केल्यानंतर आनंद व्यक्त करणारा बंगळुरूचा गोलंदाज डेव्हिड विजे. विजेने सर्वाधिक चार गडी टिपले.
प्रेक्षकांचं मनोरंजन करणा-या चीअरलीडर्स.
कोरी अँडरसनच्या जागी खेळवलेल्या उन्मुक्त चांदने मिळालेल्या संधीचे सोने करताना 37 चेंडूंमध्ये 58 धावांची खेळी केली.
मुंबईचा कर्णधार रोहीत शर्मानेही 42 धावांची उपयुक्त खेळी केली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे मालक विजय मल्ल्या सामन्याचा मजा लुटताना.
क्षेत्ररक्षकाने झेल सोडल्यामुळे निराश झालेला मुंबईचा गोलंदाज मिशेल मॅक्लिहान.
ख्रिस गेल व मनविंदर बिस्ला या जोडीला तंबूत धाडत तीन बळी घेणा-या हरभजन सिंगने मुंबईला विजयाची आशा दाखवली.
ए. बी. डिव्हिलियर्सची महत्त्वाची विकेट घेणार मुंबईचा गोलंदाज जसप्रित बुमराह.
अवघ्या 11 चेंडूंमध्ये 41 धावा ठोकत ए. बी. डिव्हिलियर्सने मुंबईच्या गोटात चिंता निर्माण केली होती.
गोलंदाजीत छाप पाडणा-या डेव्हिड विजेने 25 चेंडूंमध्ये 45 धावा ठोकत फलंदाजीही उत्कृष्ट केली.
आरंभापासून सलग चार सामने हरणा-या मुंबई इंडियन्सच्या संघाने अखेर रविवारी बंगळुरूला हरवत विजयाचे खाते उघडले. मुंबईने 209 धावा केल्यानंतर बंगळुरूला 191 धावांवर रोखले आणि 18 धावांनी हा सामना जिंकला.