सुरेश रैनाकडे मयंती लँगरने मागितला वायफायचा पासवर्ड, नेटिझन्सने घेतली फिरकी

स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आणि सुप्रसिद्ध निवेदक मयंती लँगर ही पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 08:32 AM2017-11-01T08:32:50+5:302017-11-01T08:37:43+5:30

whatsapp join usJoin us
Muneeti Langer asked Suresh Raina to sign up for Viaphafa, Netizens spin | सुरेश रैनाकडे मयंती लँगरने मागितला वायफायचा पासवर्ड, नेटिझन्सने घेतली फिरकी

सुरेश रैनाकडे मयंती लँगरने मागितला वायफायचा पासवर्ड, नेटिझन्सने घेतली फिरकी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आणि सुप्रसिद्ध निवेदक मयंती लँगर ही पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. मयंतीचं चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे. मयंतीने क्रिकेटर सुरेश रैनाकडे मागितलेल्या वाय-फाय पासवर्डमुळे ती चर्चेत आली आहे.

मुंबई- स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आणि सुप्रसिद्ध निवेदक मयंती लँगर ही पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी मयंतीचं चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे. मयंतीने क्रिकेटर सुरेश रैनाकडे मागितलेल्या वाय-फाय पासवर्डमुळे ती चर्चेत आली आहे. याआधीही अनेक वेळा ट्रोलर्सच्या निशाण्यावर मयंती आली आहे. मयंती दरवेळी तिच्या खिलाडूवृत्तीने ट्रोलला सामोरी जाते तर कधी ट्रोलर्सना सडेतोड उत्तरही देते. यावेळी मयंतीला वाय-फायच्या पासवर्डसाठी सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं.


मयंतीनं ट्विटरवर एक स्क्रिन शॉट शेअर केला आहे. यामध्ये विविध वाय-फाय नेटवर्कची चिन्हं दिसत आहे. त्यात एकानं आपल्या वायफायचं नाव सुरेश रैना असं ठेवलं होतं. ही भन्नाट कल्पना मयंतीला आवडली तेव्हा तिनं रैनाला आपल्या टि्वटमध्ये टॅग करत त्याच्याकडे वायफायचा पासवर्ड मागितला. मयंतीच्या ट्विटला एका युजरने भन्नाट उत्तर दिलं. ‘तू पासवर्ड रैनाकडे मागण्यापेक्षा थर्ड अम्पायरकडे माग’ असा सल्ला तिला दिला. मयंतीनं शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये एकानं आपल्या वायफायचं नाव थर्ड अम्पायर असं ठेवलं होतं. 



 

तेव्हा रैनाकडे पासवर्ड मागणाऱ्या मयंतीची अनेकांनी सोशल मीडियावर फिरकी घेतली. मयंतीला नेटिझन्सने वेगवेगळे मजेशीर पासवर्डही सांगितले. नेटिझन्सला उत्तर देणाऱ्या मयंतीने अजून तरी या ट्विटमुळे नेटिझन्सना कुठलंही उत्तर दिलेलं नाही. 




 



 

Web Title: Muneeti Langer asked Suresh Raina to sign up for Viaphafa, Netizens spin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.