Join us

Murali Vijay: भर सामन्यात प्रेक्षकाने दिनेश कार्तिकच्या नावाने चिडवले, मुरली विजयने स्टँडमध्ये घुसून तुडवले 

Tamil Nadu Premier League: सध्या सुरू असलेल्या तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये क्रिकेटपटू मुरली विजयला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. २४ जुलै रोजी झालेल्या सामन्यातही असाच प्रकार पुन्हा एकदा घडला. त्यानंतर संतापलेल्या मुरली विजयने मैदान सोडून स्टँडमध्ये धाव घेत प्रेक्षकाशी वाद घालत हाणामारी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 21:23 IST

Open in App

चेन्नई - सध्या सुरू असलेल्या तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये क्रिकेटपटू मुरली विजयला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. काही दिवसांपूर्वी मुरली विजय प्रेक्षकांनी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना दिनेश कार्तिकच्या नावाने हाका मारून त्याला चिडवले होते. दरम्यान, २४ जुलै रोजी झालेल्या सामन्यातही असाच प्रकार पुन्हा एकदा घडला. त्यानंतर संतापलेल्या मुरली विजयने मैदान सोडून स्टँडमध्ये धाव घेत प्रेक्षकाशी वाद घालत हाणामारी केली. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मदुराई पँथर्स आणि त्रिची वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान हा प्रकार घडला. मदुराई पँथर्सने या सामन्यात त्रिची वॉरियर्स संघाला ३६ धावांनी पराभूत केले. मात्र हा सामना मुरली विजयमुळे चर्चेत राहिला. या सामन्या दरम्यानचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या सामन्यात मुरली विजयचा संघात समावेश नव्हता. मात्र काही वेळासाठी तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी आला होता.

या दरम्यान हा प्रकार घडला. या व्हिडीओमध्ये मुरली विजय मैदानाबाहेर येत प्रेक्षकासोबत वाद घातला. मात्रा काही वेळात तो माघारी परतताना दिसत आहे. गेल्या काही दिवासंत अनेक प्रेक्षक हे मुरली विजयला दिनेश कार्तिकचे नाव घेऊन चिडवत आहेत. खासगी आयुष्याबाबत मारण्यात येत असलेल्या टोमण्यांमुळे मुरली विजयला राग आला आणि तो प्रेक्षकांजवळ गेला. काही वेळ बोलचाल झाल्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. नंतर आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर तो मैदानात परत गेला. आता या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :मुरली विजयदिनेश कार्तिकतामिळनाडू
Open in App