मुशीर खानचे वर्ल्ड कपमध्ये दुसरे शतक; शिखर धवन, बाबर आजम यांच्या विक्रमाशी बरोबरी

मुंबईचे नौशाद खान कुटुंबीयांच्या घरी मागील आठवडाभर आनंदाचं वातावरण आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 05:54 PM2024-01-30T17:54:19+5:302024-01-30T17:54:32+5:30

whatsapp join usJoin us
Musheer Khan became the 2nd Indian after Shikhar Dhawan & third player  after Babar Azam to score 2 hundreds in an U-19 World Cup | मुशीर खानचे वर्ल्ड कपमध्ये दुसरे शतक; शिखर धवन, बाबर आजम यांच्या विक्रमाशी बरोबरी

मुशीर खानचे वर्ल्ड कपमध्ये दुसरे शतक; शिखर धवन, बाबर आजम यांच्या विक्रमाशी बरोबरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Under 19 World Cup ( Marathi News ) मुंबईचे नौशाद खान कुटुंबीयांच्या घरी मागील आठवडाभर आनंदाचं वातावरण आहे. मोठा मुलगा सर्फराज खान याचे राष्ट्रीय संघात सिलेक्शन झाले, तर दुसरीडे लहान मुलगा मुशीर हा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.  मुशीर खानने आज आणखी एका शतकासह चमक दाखवली आहे.   मुंबईच्या १८ वर्षीय फलंदाजाने स्पर्धेतील दुसरे शतक झळकावले. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करताना १२६ चेंडूंत ३ षटकार व १३ चौकारांच्या मदतीने १३१ धावांची खेळी केली.  


१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत दोन शतकं झळकावणारा शिखर धवननंतर मुशीर दुसरा भारतीय फलंदाज आहे. या स्पर्धेच्या २००४ च्या आवृत्तीत शिखर धवनने ३ शतकं झळकावली होती. तेव्हा त्याने ७ डावांत ८४.१६च्या सरासरीने ५०५ धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा बाबर आजम यानेही १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये दोन शतकं झळकावण्याचा पराक्रम केला आहे. मुशीरने या वर्ल्ड कपमध्ये ४ डावांत ८१.२५च्या सरासरीने ३२५ धावा केल्या आहेत. मुशीरने आजच्या शतकापूर्वी २५ जानेवारीला आयर्लंडविरुद्ध ११८ धावांची खेळी केली होती.

Image

सुपर सिक्स ग्रुप १ मधील पहिल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना आज ८ बाद २९५ धावा केल्या. सलामीवीर आदर्श सिंगने ५२, कर्णधार उदय सहारनने ३४ धावा केल्या. 

Web Title: Musheer Khan became the 2nd Indian after Shikhar Dhawan & third player  after Babar Azam to score 2 hundreds in an U-19 World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.