स्मिथ पाठोपाठ आणखी एका स्टार क्रिकेटरनं केली निवृत्तीची घोषणा; मर्यादा होत्या तरी देशासाठी...

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील संघाच्या निराशजनक कामगिरीनंतरचा आठवडा त्रासदायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 12:06 IST2025-03-06T11:59:15+5:302025-03-06T12:06:25+5:30

whatsapp join usJoin us
Mushfiqur Rahim Retirement Bangladesh legend retires from ODI cricket After Steve Smith Champions Trophy 2025 | स्मिथ पाठोपाठ आणखी एका स्टार क्रिकेटरनं केली निवृत्तीची घोषणा; मर्यादा होत्या तरी देशासाठी...

स्मिथ पाठोपाठ आणखी एका स्टार क्रिकेटरनं केली निवृत्तीची घोषणा; मर्यादा होत्या तरी देशासाठी...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mushfiqur Rahim Retirement  : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारतीय संघा विरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथनं तडकाफडकी वनडेतून निवृत्तीची घोषणा केली. पराभव जिव्हारी लागल्यावर त्याने घेतलेल्या निर्णयाची चर्चा रंगत असताना आता आणखी एका क्रिकेटरनं निवृत्तीची घोषणा केलीये. बांगलादेशचा स्टार खेळाडू  मुशफिकुर रहिम याने सोशल मीडियाच्या माध्यमातून वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय, अशी पोस्ट शेअर केली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बांगलादेशचा संघ भारताच्या गटातून खेळताना दिसले होते. साखळी फेरीत एकही सामना न जिंकता त्यांचे आव्हान संपुष्टात आले होते. संघाची निराशजन कामगिरी    आपली घोषणा केली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

वनडेतून निवृत्तीची घोषणा करताना काय म्हणाला क्रिकेटर? 


आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉपी स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरचा आठवडा आव्हानात्मक होता. मी आजपासून एकदिवसीय क्रिकेटमधून निवृतीत जाहीर करत आहे, असा उल्लेख त्याने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केला आहे. जागतिक स्तरावर क्रिकेट खेळत असताना  आमच्या काही मर्यादा होत्या. पण ज्या ज्या वेळी मैदानात उतरलो त्या त्या वेळी देशासाठी १०० टक्के पेक्षा अधिक प्रयत्न केला. असे तो म्हणाला आहे.   

२००७ च्या  वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाविरुद्ध केली होती अविस्मरणीय खेळी

२००५ मध्ये मुशफिकुर रहिम याने कसोटीतून  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २००६ मध्ये त्याला एकदिवसीय संघात पदार्पणाची संधी मिळाली. २००७ मध्ये रंगलेल्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशच्या संघानं  भारतीय संघाला आश्चर्यकारकरित्या पराभवाचा धक्का देत स्पर्धेबाहेर काढले होते. या सामन्यात मुशफिकुर याने नाबाद ५६ धावांची खेळी केली होती.  वनडे कारकिर्दीत त्याने  २७४ सामन्यांत ९ शतके आणि ४९ अर्धशतकासह ७७९५ धावा केल्या आहेत. १९ वर्षांच्या प्रदिर्घ कारकिर्दीनंतर या क्रिकेटपटूनं निवृत्ती घेतलीये. 
 

Web Title: Mushfiqur Rahim Retirement Bangladesh legend retires from ODI cricket After Steve Smith Champions Trophy 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.