इंदूर : स्थानिक क्रिकेटमधील दिग्गज संघ मुंबईला आज, शुक्रवारपासून प्रारंभ होत असलेल्या सैयद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या सुपर लीगमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेची उणीव भासेल. तो दुखापतग्रस्त आहे. दुखापत गंभीर नाही; पण सावरण्यासाठी विश्रांतीची गरज आहे.
मुंबई व्यतिरिक्त कर्नाटक, बंगाल आणि रणजी व इराणी कप चॅम्पियन विदर्भ या संघांचा स्थानिक टी-२० स्पर्धेत जेतेपदाच्या शर्यतीत समावेश आहे. सर्वांची नजर मुंबई संघावर केंद्रित झाली आहे..
मुंबई निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या मते रहाणेला साखळी फेरीत खेळावे लागले होते; पण आता दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला विश्रांतीची गरज आहे. साखळी फेरीत मुंबई संघाने ‘क’गटात सहापैकी पाच सामने जिंकत अव्वल स्थान पटकाविले होते. पण, रहाणेने त्यात ९.६७ च्या सरासरीने केवळ ५८ धावा केल्या होत्या. रहाणेच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यर मुंबई संघाचे नेतृत्व करेल.
सुपर लीगमध्ये मुंबई संघाला ‘ब’ गटात कर्नाटक, दिल्ली, विदर्भ आणि उत्तर प्रदेश या संघांसह स्थान मिळाले आहे, तर ‘अ’ गटात झारखंड, गुजरात, रेल्वे, बंगाल व महाराष्ट्र, आदी संघांचा समावेश आहे. होळकर स्टेडियममध्ये १४ मार्चला अंतिम लढत रंगणार आहे.
‘अ’ गटातून झारखंड व दिल्ली, ‘ब’ गटातून विदर्भ व गुजरात, ‘क’ गटातून मुंबई व रेल्वे, ‘ड’ गटातून कर्नाटक व बंगाल आणि ‘ई’ गटातून उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या संघांनी सुपर लीगमध्ये स्थान मिळविले आहे.
Web Title: Mushtaq Ali T20: Churning for the title; The final match on March 14
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.