मँचेस्टर : ‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न खेळाडूंनी करावा. मालिकेतील पहिल्या सामन्यापासूनच विंडीज खेळाडूंनी आघाडी घ्यायला पाहिजे,’ असे मत वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी व्यक्त केले.
कोरोनामुळे सुमारे तीन महिन्यापासून जास्त काळ क्रिकेटविश्व थांबले आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्या विंडीज संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असून संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष या मालिकेकडे लागले आहे. या मालिकेद्वारे विंडीज संघ गेल्या ३२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच मालिका विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. मात्र यासाठी विंडीजच्या फलंदाजांना विशेष कामगिरी पार पाडावी लागेल. प्रशिक्षक सिमन्स म्हणाले की, ‘संघातील अनेक वरिष्ठ खेळाडू चांगले आहेत आणि ८ जुलैपासून साऊदम्पटन येथे सुरू होणाºया पहिल्या कसोटी सामन्यासाठी हे सर्व खेळाडू सज्ज असतील अशी आशा आहे.’
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सिमन्स म्हणाले की, ‘माझ्या मते आमचे खेळाडू मानसिकरीत्या मजबूत आहेत, पण त्यांना आपल्या कौशल्यावरही लक्ष द्यावे लागेल. क्रेग ब्रेथवेट्स, रोस्टन चेज आणि शाय होप हे मानसिकरीत्या सक्षम आहेत, कारण इतक्या मोठ्या स्तरावर खेळण्याचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. त्यामुळे आता निश्चित करावे लागेल की, हे अनुभवी खेळाडू पहिल्या सामन्यात शानदार प्रदर्शन करतील.’
सिमन्स म्हणाले, ‘आमच्यासोबत असे अनेकदा घडले आहे की, दौºयातील पहिल्या सामन्यानंतर आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. त्यामुळे आता आम्ही ही परंपरा हटविण्याच्या प्रयत्नात आहोत. पहिल्या कसोटीपासूनच चांगला खेळ करण्याचा आमचा निर्धार आहे.’
त्यावेळी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर लीड्स येथे दुसरा सामना जिंकून विंडीजने १-१ अशी बरोबरी साधली होती. मात्र लॉडर््स येथे झालेल्या अंतिम कसोटी सामन्यात विंडीजचा ९ गड्यांनी पराभव झाला होता. ‘पहिला सामना सुरू होण्यास केवळ दोन आठवड्यांचा अवधी बाकी आहे आणि तयारींना वेग आणण्यासाठी आम्ही आतापासूनच सरावास सुरुवात केली आहे,’ असेही सिमन्स यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
>तीन वर्षांपूर्वी इंग्लंड दौºयावर आलेला विंडीज संघ प्रत्येक डावामध्ये २०० धावांच्या आतमध्ये गारद झाला होता. याशिवाय त्यांना एजबस्टन येथे एक डाव आणि २०९ धावांनी भला मोठा पराभवही पत्करावा लागला होता.
Web Title: Must take the lead from the first Test-Phil Simmons
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.