भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी वन डे वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. वेस्ट इंडिज ( Away) , बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज ( Home) मालिकेत तो खेळला नाही. पुढील ऑस्ट्रेलिया व श्रीलंका मालिकेतही त्याच्या खेळण्याची शक्यता कमीच आहे. 38 वर्षीय धोनीच्या निवृत्तीच्या चर्चाही सुरू आहेत आणि त्यामुळेच तो ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहेत. क्रिकेटपासून दूर असलेला धोनी कुटुंबियांना पुरेपूर वेळ देत आहे. त्यानं सोमवारी सोशल मीडियावर पत्नी साक्षीचा एक जूना पण मजेशीर व्हिडीओ शेअर केला.
विश्वचषकानंतर आर्मीबरोबर सराव करण्यासाठी धोनी काही दिवस जम्मू-काश्मीरमध्ये होता. यावेळी त्याने आर्मीतील जवानांचे काम जवळून पाहिले आहे आणि या गोष्टीचाच फायदा धोनीला यापुढे होणार आहे. धोनी टीव्हीवर एक मालिका घेऊन येणार असल्याचे बोलले जात आहे. या मालिकेमध्ये भारतीय सैनिकांनी शौर्यगाथा दाखवण्यात येणार आहे. देशाचे सैनिक हे महत्वाचे असतात. पण त्यांना प्रसिद्धी मिळत नाही. त्यांनी केलेले शौर्य सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे सैनिकांनी कशी मर्दुमकी गाजवली आहे, हे दाखवण्याचा या मालिकेचा उद्देश असेल. या मालिकेसाठी धोनीची निवड केल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेची संहिता लिहिण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यानंतर काही दिवसांमध्येच या मालिकेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
पाहा व्हिडीओ...