चेन्नई : वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज शिमरॉन हेटमायेरने भारताविरुद्ध पहिल्या केलेली १३९ धावांची खेळी कारकिर्दीतील सर्वोत्तम असल्याचे म्हटले, ‘पण अखेरपर्यंत नाबाद राहिलो असतो तर अधिक आनंद झाला असता,’ असेही त्याने सांगितले.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना हेटमायेर म्हणाला, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही माझी सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे ही माझी सर्वश्रेष्ठ खेळी आहे.
लक्ष्याचा पाठलाग करणे नेहमी चांगले असते. लक्ष्याचा पाठलाग करताना संघाला विजय मिळवून देण्याचा अनुभव वेगळाच असतो. अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकता आले नाही, याचे शल्य आहे.’ त्याचवेळी, ‘शाय होपसोबत असल्यामुळे माझ्यासाठी फलंदाजी सोपी
झाली. कारण दोघांदरम्यान चांगला ताळमेळ आहे, ’ असेही तो यावेळी म्हणाला.
हेटमायरने पुढे सांगितले की, ‘प्रदीर्घ कालावधीपासून आम्ही सोबत खेळत आहोत. आम्हाला एकमेकांच्या खेळाची चांगली कल्पना आहे. मी आक्रमक खेळतो आणि तो एक टोक सांभाळून ठेवतो.’
आयपीएलचा लिलाव १९ डिसेंबरला असून त्यापूर्वी हेटमायेरने ही खेळी केली, पण सध्या माझे लक्ष लीगवर नसल्याचे त्याने स्पष्ट केले. आयपीएलच्या गेल्या सत्रामध्ये तुफानी फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हेटमायरला आपल्या लौकिकानुसार खेळ करण्यात अपयश आले होते.
त्यामुळे आयपीएल लिलावापूर्वी काही सिद्ध करायचे होते का? असा प्रश्न विचारले असताना याबाबत हेटमायर म्हणाला की, ‘मी नेहमी केवळ माझ्या फलंदाजीचा आनंद घेत असत्प्. क्रिकेटमध्ये अनेकदा
तुमच्या धावा होतात, तर अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागते. यंदा मला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही, पण यावेळी मिळालेला अनुभव चांगला होता. त्यामुळे आता मला दमदार पुनरागमन करण्यास मदत झाली.’ (वृत्तसंस्था)
Web Title: This is my best game - the hatmayer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.