भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं नुकतीच सर्वांना एक गोड बातमी दिली. प्रेयसी नताशा स्टँकोव्हिच गर्भवती असल्याची बातमी त्यानं सोशल मीडियावरून दिली. त्यानं गुपचूप लग्नही उरकल्याची चर्चा सुरू आहे. हार्दिकचं सर्वांनी अभिनंदन केले. पण, हार्दिकला एका गोष्टीचं दुःख अजूनही वाटत आहे. समालोचक हर्षा भोगले यांच्याशी चर्चा करताना त्यानं ती खंत बोलून दाखवली. क्रिकेटच्या मैदानावर अनेक अविस्मरणीय खेळी करणाऱ्या पांड्याचं नाव कॉफी विथ करण कार्यक्रमामुळे वादात अडकले होते. त्या कार्यक्रमात त्याच्यासह लोकेश राहुलही होता आणि हार्दिकनं त्यावेळी महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य केलं होतं. भोगले यांच्याशी बोलताना त्यानं त्या गोष्टीची खंत व्यक्त केली. त्या प्रसंगामुळे चांगला धडा शिकवला, असं तो म्हणाला.
क्रिकबझच्या कार्यक्रमात भोगले व हार्दिक बोलत होते. हार्दिक म्हणाला,''तो वाद जेव्हा झाला, तेव्हा त्याचा स्वीकार करण्याचं मी ठरवलं आणि ती चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. मी ती चूक स्वीकारली नसती, तर त्या गोष्टीनं अजून माझी पाठ सोडली नसती. माझ्या कुटुंबीयांनीही त्याचा स्वीकार केला.''
26 वर्षीय हार्दिक पुढे म्हणाला,''मी कौटुंबीक व्यक्ती आहे. कुटुंबीशिवाय मी काहीच नाही. ते माझा आधार आहेत. आज तुमच्यासमोर जो हार्दिक पांड्या आहे, तो त्यांच्यामुळेच आहे. त्यांनी मला कधीच खचू दिले नाही. मला सतत आनंदी ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.''
त्यामुळेच त्या विधानानंतर हार्दिकच्या कुटुंबीयांवरही खालच्या पातळीची टीका झाली. त्यामुळे हार्दिक प्रचंड दुःखी झाला होता. तो म्हणाला,''माझ्या कुटुंबाला शिविगाळ करण्यात आली. त्या घटनेनंतर माझ्या वडिलांनी मुलाखत दिली आणि त्यातही त्यांच्यावर लोकांनी टीका केली. माझ्या चूकीमुळे कुटुंबाला समस्येला सामोरे जावं लागले, यानं मनाला प्रचंड वेदना झाल्या होत्या.''
निर्दयी मनुष्य; गर्भवती हत्तीची निर्घृण हत्या; भुकेनं व्याकुळ भटकत होती
17 वर्षीय नसीम शाह टीम इंडियाच्या विराट कोहलीला सहज बाद करेल; पाकिस्तानी क्रिकेटपटूचा दावा
वाईट बातमी: नऊ वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या खेळाडूनं घेतला अखेरचा श्वास