Join us  

रोहित शर्माला मिळालेलं पहिलं मानधन किती होतं? 2020मध्ये 124 कोटी नेट वर्थ असलेल्या हिटमॅननं दिलं उत्तर

फ्रेंडशीप डेच्या निमित्तानं रोहितनं रविवारी फॅन्सच्या प्रश्नांना उत्तर दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 4:12 PM

Open in App

टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माचा जन्म नागपूरच्या बनसोड येथे झाला. त्याचे वडील सुतारकाम करायचे. त्याच्या काकांनी त्याला मुंबईत आणले आणि तेथून त्याच्या क्रिकेटचा प्रवास सुरु झाला. 1999मध्ये काकांनी दिलेल्या पैश्यांमुळे तो क्रिकेट कॅम्पला गेला. हॅरिस शिल्ड आणि गाईल्स शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत पदार्पणातच त्यानं सलामीवीर म्हणून शतक झळकावलं होतं. त्यानंतर रोहितच्या कामगिरीचा आलेख चढाच राहीला... आज संपूर्ण जग रोहितला 'हिटमॅन' म्हणून ओळखतं. पण, तुम्हाला हे माहित्येय का रोहितला क्रिकेटमधून मिळालेलं पहिलं मानधन किती होतं?

भाई, चर्चा तर होणारच ना!; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो

रोहितनं मुंबईत क्रिकेटचे धडे गिरवले. ट्रायलसाठी तो एक दिवस स्टेडियममध्ये पोहोचला, तेव्हा नेट्समध्ये फलंदाजाच्या ट्रायल्ससाठी मोठी रांग त्यानं पाहीली. तेव्हा त्यानं गोलंदाज बनण्याचा निर्णय घेतला आणि ऑफ स्पिन गोलंदाजीही केली. तेव्हा त्याची निवडही झाली. 2005मध्ये श्रीलंकेचा ज्युनियर संघ भारत दौऱ्यावर आला होता. 50 षटकांच्या सामन्यात रोहितच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आणि गोलंदाज बनण्याचं त्याचं स्वप्न अपूर्ण राहिले.  पण, प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहितमधील टॅलेंट ओळखले आणि त्याला फलंदाज बनण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यानं फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं आणि आज तो जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.

रोहितकडे आज कोट्यवधींची मालमत्ता आहे, परंतु जेव्हा त्यानं क्रिकेटला सुरुवात केली तेव्हा त्याच्याकडे शाळेची फी भरण्यासाठीचेही पैसे नव्हते. रोहित सुरुवातीला डोंबिवलीच्या वेलानकन्नी हायस्कूलमध्ये शिकायचा, परंतु क्रिकेटसाठी त्यानं बोरीवली गाठलं. येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याला अॅडमिशन घेण्याचा सल्ला दिला गेला. पण, त्याच्या कुटुंबीयांकडे फीसाठीचे पैसे नव्हते. रोहितचं टॅलेंट पाहून शाळेनं त्याची फी माफ केली. 

फ्रेंडशीप डेच्या निमित्तानं रोहितनं रविवारी फॅन्सच्या प्रश्नांना उत्तर दिली. त्यात रोहितला पहिल्या कमाईबद्दल विचारण्यात आले. त्यावर रोहित म्हणाला,''माझी पहिली कमाई चेक ( धनादेश) ने आलेली नव्हती. ते पन्नास रुपये होते आणि शाळेत क्रिकेट खेळताना मला ते दिले गेले होते. त्या पैशांतून आम्ही मित्रांनी वडापाव खाल्ला होता. 2020मध्ये रोहितची नेट वर्थ 124.5 कोटी इतका आहे. बीसीसीआयच्या करारानुसार त्याला 7 कोटी इतका पगार मिळतो.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

आयर्लंडच्या 21 वर्षीय कर्टीस कॅम्फरनं पटकावलं दिग्गजांच्या पंक्तित स्थान!

मोठी बातमी; IPL बरोबर यूएईत रंगणार महिलांची ट्वेंटी-20 चॅलेंज लीग, सौरव गांगुलीनं दिले संकेत

कारगिल युद्धात भारताविरुद्ध सीमेवर लढण्यास तयार होतो; शोएब अख्तरचा दावा

हा फोटो नीट पाहा, या लहान मुलांपैकी एक आहे भारताचा महान फलंदाज!

IPL 2020 साठी महेंद्रसिंग धोनी झाला सज्ज; 'कॅप्टन कूल'चा नवा लुक व्हायरल

टॅग्स :रोहित शर्माफ्रेंडशिप डेसोशल मीडिया