विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare Trophy 2021) स्पर्धेत पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) भन्नाट फॉर्मात आहे. विजय हजारे ट्रॉफीत एका पर्वात सर्वाधिक ७५४ धावा, नाबाद २२७ धावांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी अन् विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी यांचाही विक्रम पृथ्वीनं यंदाच्या स्पर्धेत मोडला. त्यानं ७ सामन्यांत एका द्विशतकासह चार शतकी खेळी केली. पण, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हाच पृथ्वी पूर्णपणे अपयशी ठरला होता. अचानक तो धावांचा पाऊस कसा पाडू लागला, याला महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचा गुरूमंत्र कारणीभूत आहे. ( advice got from Sachin Tendulkar ) रोहित शर्मासोबत आज सलामीला कोण उतरणार?; विराट कोहलीचा खास मित्राला पाठिंबा
Indian Express शी बोलताना पृथ्वी म्हणाला, ''जेव्हा मला सर्वांनी नाकारले, तेव्हा मी स्वतःवरील विश्वास कमी होऊ दिला नाही. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी मी कुठे चुकतोय, हे समजावून सांगितले. मला त्या चुकांवर तोडगा नेट्समध्ये शोधायचा होता. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर मी सचिन सरांना भेटलो. फलंदाजीच्या शैलीत फार काही बदल करू नकोस, फक्त बॉल शरिराजवळून खेळ, असं त्यांनी मला सांगितलं. '' Prithvi Shaw had a miserable 2020 with the bat
तो म्हणाला,''पहिल्या कसोटीतील अपयशानंतर मला संघातून वगळण्यात आले आणि मी प्रचंड तणावाखाली गेलो. मी आता काहीच करू शकत नाही, असे मला वाटू लागले. पण, आता धावा केल्यानंतर मला आनंद झाला आहे. काही झालं तरी खचायचं नाही, हे मी स्वतःशी ठरवले होते.''
पृथ्वी शॉची यंदाच्या पर्वातील कामगिरी ( Prithvi Shaw in Vijay Hazare 2021)१०५*( ८९) वि. दिल्ली ३४ ( ३८) वि. महाराष्ट्र२२७* ( १५२) वि. पुद्दुचेरी३६ ( ३०) वि. राजस्थान२ ( ५) वि. हिमाचल प्रदेश१८५* ( १२३) वि. सौराष्ट्र ( उपांत्यपूर्व फेरी)१६५ ( १२२) वि. कर्नाटक ( उपांत्य फेरी) ७ सामन्यांत ७५४ धावा, १ द्विशतक व ३ शतकं. १८८.५ ची सरासरी व १३४.८८चा स्ट्राईक रेट