'मी थांबणार नाही'; वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ट्रोल करणाऱ्यांना इरफान पठाणचं सडेतोड उत्तर

बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानं भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मताचं केलं समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 03:30 PM2020-06-11T15:30:55+5:302020-06-11T15:32:25+5:30

whatsapp join usJoin us
'My opinions are for India, I won’t stop' - Irfan Pathan after being criticised for post on racism | 'मी थांबणार नाही'; वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ट्रोल करणाऱ्यांना इरफान पठाणचं सडेतोड उत्तर

'मी थांबणार नाही'; वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ट्रोल करणाऱ्यांना इरफान पठाणचं सडेतोड उत्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर जगभरात वर्णद्वेषाचा मुद्द्यावर लोकं निदर्शनं करताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्येही अशा वर्णद्वेषी घटना घडत असल्याचा दावा डॅरेन सॅमी, ख्रिस गेल यांनी केला. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना सहकाऱ्यांकडून वर्णद्वेषी टिप्पणी होत असल्याचा दावा सॅमीनं करताना खळबळ उडवली. आता टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यानं वर्णद्वेषावर स्पष्ट मत मांडलं आहे. त्यानं हे मत मांडताना अप्रत्यक्षपणे मुस्लीम लोकांना सोसायटीमध्ये घर नाकारण्याच्या वृत्तीवर टीका केली.

इरफाननं ट्विट केलं की,''वर्णद्वेष हा केवळ एखाद्याच्या रंगापर्यंत मर्यादित नाही. तुमचा धर्म दुसरा आहे म्हणून तुम्हाला सोसायटीत घर नाकारलं जातं, हेही वर्णद्वेष आहे.''



त्याच्या या ट्विटला अनेक सेलिब्रेटींनी पाठींबा दर्शवला. पण, ट्रोलर्सनं त्याला काही जाहीराती दाखवून वर्णद्वेष कोण करतंय, असा प्रतीसवाल विचारला. नेटिझन्सनी त्याला प्रचंड ट्रोल केले. त्यावर इरफाननं सडेतोड उत्तर दिलं. त्यानं ट्विट केलं की,''माझं मत हे एक भारतीय म्हणून असतं आणि देशासाठी असतं.. मी थांबणार नाही.'' 

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

IPL 2020 खेळवणारच, BCCIने कसली कंबर; सौरव गांगुलीनं राज्य संघटनांना पाठवले पत्र

भावा स्वतःच्या जीवावरच मी इतकी वर्ष खेळलो; रोहित शर्माच्या ट्विटला Yuvraj Singhचं उत्तर

क्वारंटाईन सेंटरमध्ये रंगली क्रिकेट मॅच; माजी मुख्यमंत्र्यांनी शेअर केलेला Video लाखोंनी पाहिला

#MissYouYuvi ट्रेंडवर युवराज सिंगची पत्नी हेझल किचची प्रतिक्रिया, म्हणते...

ऑस्ट्रेलिया दौरा सोपा नसेल; राहुल द्रविडनं कॅप्टन विराट कोहलीला सांगितला धोका 

जगातील सर्वात श्रीमंत WWE सुपरस्टार; कमाई ऐकून व्हाल थक्क! 

Shocking : आसाममधील गॅस विहिरीच्या भीषण आगीत भारतीय फुटबॉलपटूनं गमावला जीव!

Web Title: 'My opinions are for India, I won’t stop' - Irfan Pathan after being criticised for post on racism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.