IPL 2023 दरम्यान गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात जोरदार वाद झाला होता. दोघांमधील या वादाने बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंच्या नात्यात दुरावा असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. या अफवांचे खंडन करताना गंभीरने विराट कोहली आणि त्याच्या नात्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली.
गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. आयपीएलमध्येही दोन्ही खेळाडू अनेकदा आमनेसामने आले आहेत. अगदी अलीकडे, आयपीएल २०२३ मध्ये, दोन्ही खेळाडू लखनौच्या मैदानावर भांडले होते. “लोक मला विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीसोबतच्या नात्याबद्दल विचारतात. मी सर्वांना सांगतो की माझे धोनीशी तेच नाते आहे, जे माझे कोहलीशी आहे. कारण त्याला जिंकायचे आहे आणि मलाही. लढाईचा संबंध फक्त मैदानापुरता मर्यादित राहतो.''
लखनौ सुपर जायंट्सचा सलामीवीर काइल मेयर्ससोबत चर्चेत सामील होण्यापूर्वी कोहलीची वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकसोबत वादावादी झाली होती. सामन्यानंतर गंभीर आणि विराट कोहली यांच्यात भांडण झाल्याचेही पाहायला मिळाले. माजी कर्णधार कोहली आणि लखनौ संघाचे मार्गदर्शक गंभीर यांना त्यावेळी आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.२१ चे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्या मॅच फीच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला होता.
"हे बघा, क्रिकेटच्या मैदानावर माझ्यासोबत अनेक भांडणं झाली आहेत. मी कधीच लढलो नाही असे नाही. मी नेहमी ते वाद फक्त क्रिकेटच्या मैदानावरच राहू द्यावेत याची काळजी घेतली आहे. वाद हा दोन व्यक्तींमध्ये होता आणि तो क्रिकेटच्या मैदानातच राहिला पाहिजे आणि त्याच्या बाहेर नाही. बर्याच लोकांनी टीआरपीसाठी मुलाखतीची मागणी केली, त्यांनी मला स्पष्टीकरण देण्यास सांगितले. दोन लोकांमध्ये घडलेल्या गोष्टीचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही," गंभीरने स्पष्ट केले.