जगभरात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 24 लाख 81,866 इतकी झाली आहे. त्यापैकी 1 लाख 70,455 जणांना प्राण गमवावे लागले, तर 6 लाख 51,542 जणं बरी झाली आहेत. अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. कोरोना व्हायरसचं संकट संपल्यानंतरही क्रिकेटपटूंमध्ये एक भीती कायम असणार आहे. विशेषतः गोलंदाजांमध्ये... कारण चेंडू चमकावण्यासाठी त्यांना लाळचा वापर करावा लागतो. पण, आता पुढे तो करायचा की नाही, यावर चर्चा सुरू आहे. पण, चेंडू चमकावण्यासाठी लाळ वापरू नका, असा सल्ला 10-11 वर्षांपूर्वी दिल्याचा दावा पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरनं केला आहे.
कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे, तर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धाही होणार की नाही, याबाबात साशंकता आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) व्हिडीओ कॉन्फरंसींगनं मिटींग घेणार आहे. त्यात याबाबत चर्चा केली जाईल. त्यात आगामी स्पर्धांमध्ये चेंडू चमकावण्यासाठी लाळ वापरायची की नाही, यावरही चर्चा अपेक्षित आहे. त्यावर अख्तर म्हणाला,'' पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ( पीसीबी) 10-11 वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीत मी हा मुद्दा मांडला होता. तेव्हा लोकांनी मला मुर्खात काढलं होतं.''
44 वर्षीय अख्तरनं यूट्यूब चॅनेलवर हा दावा केला. तो म्हणाला,''10-11 वर्षांपूर्वी पीसीबीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता, परंतु तेव्हा कोण उपस्थित होते, हे मी सांगणार नाही. एकच चेंडू अनेक खेळाडू हाताळतात आणि त्यापैकी एक आजारी असला तरी तो इतरांनाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाळ लावून चेंडू चमकावणं थांबवलं पाहीजे, परंतु तेव्हा माझा सल्ला कोणी एकला नाही.''
पाहा व्हिडीओ
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाऊनमध्ये फुटबॉलपटू ड्रोनने पाठवतोय 35 लाख कंडोम; कोरोना लढ्यात असाही हातभार
चीनमध्येही कमळ खुलणार; जगातील सर्वात मोठे स्टेडिअम बांधणार
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडला धक्का; 'Hotness' मध्ये 20 वर्षीय अभिनेत्रीनं टाकलं मागे
फुटबॉल विश्वाला धक्का; सामन्यासाठी सराव करताना 22 वर्षीय खेळाडूचा मृत्यु