"न्यूझीलंडविरुद्धचा सामना संपताच माझ्यासह पत्नीला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती"

मीरपूरच्या शेर ए बांगला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या २२२ धावांचा पाठलाग करताना १७२ धावांत बाद होताच द. आफ्रिका संघ ४९ धावांनी पराभूत झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 08:08 AM2021-05-19T08:08:18+5:302021-05-19T08:09:27+5:30

whatsapp join usJoin us
My wife and I were threatened with death - Duplessis | "न्यूझीलंडविरुद्धचा सामना संपताच माझ्यासह पत्नीला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती"

"न्यूझीलंडविरुद्धचा सामना संपताच माझ्यासह पत्नीला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती"

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : ‘न्यूझीलंडविरुद्ध २०११च्या विश्वचषकात उपांत्यपूर्व सामन्यात झालेल्या पराभवादरम्यान एबी डिव्हिलियर्स धावबाद झाल्यामुळे मला आणि पत्नीला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती’, असा खुलासा फाफ डुप्लेसिस याने केला.

मीरपूरच्या शेर ए बांगला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या २२२ धावांचा पाठलाग करताना १७२ धावांत बाद होताच द. आफ्रिका संघ ४९ धावांनी पराभूत झाला. त्या सामन्यात डुल्लेसिसने ४३ चेंडूत ३६ धावा काढल्या होत्या. ही स्पर्धा भारताने जिंकली होती.
ईएसपीएन क्रिकइन्फोने डुप्लेसिसचा हवाला देत सांगितले की, सामना संपताच मला आणि पत्नीला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. सोशल मीडियावर आम्हा दोघांवर अत्यंत हीन आणि अर्वाच्य भाषेत टीका करण्यात आली. अनेक आक्षेपार्ह आरोप झाले. ‘कारकिर्दीत सर्वच खेळाडू अशा अवस्थेतून जात असतात, अशावेळी ते अनेकांशी संपर्क ठेवत नाहीत. याच कारणास्तव मी शिबिरातच सुरक्षित स्थानाचा शोध घेत क्रिकेटमध्ये घाम गाळत राहिलो, असे प्रसंग आपल्याला आत्ममग्न होण्यास भाग पाडतात’, असे डुप्लेसिसने म्हटले आहे.

Web Title: My wife and I were threatened with death - Duplessis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.