भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल सध्या वैयक्तिक आयुष्यातील नकारात्मक गोष्टींमुळे चर्चेत आहे. धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्यातील नातं तुटलं असून ही जोडी घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. त्यात एक नवी मिस्ट्री गर्ल प्रकाशझोतात आली. चहल आणि धनश्रीच्या पोस्टनंतर आता या तरुणीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धनश्रीसोबतच नातं तुटल्याची चर्चा रंगत असताना चहलच्या आयुष्यात मिस्ट्री गर्लची एन्ट्री
धनश्रीचं चहलवरील प्रेम आटल्याची चर्चा रंगली असताना क्रिकेटरसोबतच्या फ्रेममध्ये दिसलेली मिस्ट्री गर्लमुळं दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा जोर धरू लागली. ही मिस्ट्री गर्ल एक आरजे निघाली. दोघांच्यात डेटिंगचा खेळ सुरु असल्याची गोष्ट वाऱ्यासारखी पसरत असताना संबंधित आरजे महवश हिची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत तिने या चर्चेला खतपाणी घालणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.
चहलसोबतच्या डेटिंगसंदर्भातील चर्चेवर ती स्पष्टच बोलली, म्हणाली...
आरजे महवश हिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, इंटरनेटवरील काही लेखाच्या माध्यमातून मेजदार आणि अर्थहिन अफवा पसरत आहेत. एखादी महिला पुरुषासोबत दिसली तर त्याचा अर्थ ती त्याच्यासोबत डेटिंग करते असा काढायचा असतो का? माफ करा पण तुम्ही कोणत्या युगात जगताय? मग तुम्ही आयुष्यात किती लोकांसोबत डेट करत आहात? या प्रश्नांचा भडिमार करत आरजे महवश हिने सोशल मीडियावर रंगणाऱ्या गोष्टी खोट्या असल्याचे म्हटले आहे. २-३ दिवसांपासून मी शांत होते. पण आता बस्स झालं. दुसऱ्याची छबी लपवण्यासाठी कोणत्याही पीआर टीमला मला यात ओढू देणार नाही. मुश्किल परिस्थितीत लोकांना आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शांत राहू द्या, उल्लेखही तिने आपल्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून शेअर केलेल्या पोस्टमधून केला आहे.
तिने स्वत: आपल्या इन्स्टा अकाउंटवरुन शेअर केली होती क्रिकेटरसोबतची पोस्ट
क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत दिसलेली मिस्ट्री गर्ल आरजे महवश ही सोशल मीडियाव चांगलीच सक्रीय आहे. तिच्या फॉलोअर्सचा आकडा हा १.४ मिलियनच्या घरात आहे. चहलसोबतचे फोटो आणि व्हिडिओ हे देखील तिने आपल्याच सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले होते. ख्रिसमस सेलिब्रेशन वेळीच्या या फोटो व्हायरल झाल्यावर तिचं नाव चहलसोबत जोडण्यात येत होते. पण आता तिने यात कोणतेही तथ्य नाही हे स्पष्ट केल्याचे दिसून येते.