मुंबई : वेस्ट इंडिज संघातील स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर ट्वेंटी-20 क्रिकेटमधील अनेक विक्रम आहेत. तो ट्वेंटी-20 क्रिकेटचा परफेक्ट ब्रँड अॅम्बेसिडर आहे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्याला विक्रम करण्यापासून रोखणे हे जवळपास अशक्य आहे. त्याच्या या घोडदौडीत आणखी एक विक्रम जमा झाला आहे. गेल मॅझन्सी सुपर लीगमध्ये जोझी स्टार संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. यासह दहा विविध व्यावसायिक लीगमध्ये खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या मॅझन्सी सुपर लीगमध्ये गेल खेळत आहे. 39 वर्षीय गेलने जोझी स्टारकडून खेळताना पहिल्याच सामन्यात 19 चेंडूंत 23 धावा केल्या. मात्र, स्टार्सना नेल्सन मंडेला बे जायंट्स संघाने पाच विकेट्स राखून पराभूत केले.
गेलने अफगाणिस्तान प्रीमिअर लीग ( बल्ख लीजंट्स), मॅझन्सी सुपर लीग ( जोझी स्टार), कॅरेबियन प्रीमिअर लीग ( जमैका थल्लावाह, सेंट किट्स अॅण्ड नेव्हिस पॅट्रीओट्स), इंडियन प्रीमिअर लीग ( कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, किंग्ज इलेव्हन पंजाब), पाकिस्तान सुपर लीग ( लाहोर कलंदर्स आणि कराची किंग्ज), बिग बॅश लीग ( सिडनी थंडर्स आणि मेलबर्न ), रॅम स्लॅम टी20 ( हायव्हेल्ड लायन्स), व्हिटालिटी ब्लास्ट ( सोमरसेट), बांगलादेश प्रीमिअर लीग (बॅरीसाल बुल्स, ढाका ग्लॅडीएटर्स, चितगांव विकिंग्ज आणि रांगपूर रायडर्स ) आणि ग्लोबल टी20 कॅनडा ( व्हॅंकोव्हर नाईट्स) या लीगमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.
Web Title: Mzansi Super League: Chris Gayle creates new T20 record after playing for Jozi Stars
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.