नागपुरात विजयी मालिका कायम,दुसरा सामना जिंकून मालिकेत घेतली २-० ने आघाडी

अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या दुसऱ्या वन डेत भारताने आॅस्ट्रेलियाचा अवघ्या आठ धावांनी पराभव करीत पाच सामन्यांच्या मालिकेत मंगळवारी २-० अशी विजयी आघाडी संपादन केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 04:30 AM2019-03-06T04:30:53+5:302019-03-06T04:31:06+5:30

whatsapp join usJoin us
In Nagpur, the winning series continued, winning the second match took 2-0 lead in the series | नागपुरात विजयी मालिका कायम,दुसरा सामना जिंकून मालिकेत घेतली २-० ने आघाडी

नागपुरात विजयी मालिका कायम,दुसरा सामना जिंकून मालिकेत घेतली २-० ने आघाडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नागपूर: अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या दुसऱ्या वन डेत भारताने आॅस्ट्रेलियाचा अवघ्या आठ धावांनी पराभव करीत पाच सामन्यांच्या मालिकेत मंगळवारी २-० अशी विजयी आघाडी संपादन केली. त्यासोबतच भारताने नागपुरमध्ये आॅस्ट्रेलियावरील आपली विजयी मालिका कायम ठेवली. भारताने नागपूरमध्ये आॅस्ट्रेलियाविरुध्दचे आतापर्यंतचे चारही वन डे सामने जिंकले आहेत.
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा मैदानावर भारताचा डाव ४८.२ षटकात २५० धावात आटोपला. भारताच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी त्यांच्या तोंडचे पाणी पळवून ४९.३ षटकात २४२ धावात गुंडाळले. याआधी येथे ओळीने तिन्ही सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा या मैदानावरील हा चौथा विजय ठरला. भारताने खेळलेल्या एकूण एकदिवसीय सामन्यांचा विचार करता आजचा ५०० वा विजय होता. आज ४० वे शतक ठोकणारा कर्णधार विराट कोहली हा ‘सामनावीर’ ठरला.
मार्कस् स्टोयनिस याने ६५ चेंडूत सर्वाधिक ५२ धावांचे योगदान दिले खरे पण विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले. हॅन्डस्कोम्बने ४८, उस्मान ख्वाजा ३८ आणि कर्णधार अ‍ॅरोन फिंच याने ३७ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक तीन तसेच बुमराह आणि विजय शंकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
डावाची सुरुवात करणारे फिंच-ख्वाजा यांनी सलामीला १५ व्या षटकापर्यंत ८३ धावांनी भागीदारी केल्यानंतर कुलदीपने फिंचला (३७) पायचित करुन पहिला धक्का दिला. सहा चेंडूनंतर केदार जाधवने ख्वाजाला (३८) विराटकडे सोपा झेल देण्यास बाध्य करीत पाहुण्यांना अडचणीत आणले. हॅन्डस्कोम्ब- शॉन मार्श यांनी तिसºया गड्यासाठी ३९ धावांची भागीदारी केली. मार्श (१६) जडेजाचा बळी ठरला तर मॅक्सवेलची कुलदीपने अवघ्या चार धावांवर दांडी गूल केली. एक टोक सांभाळणारा हॅन्डस्कोम्ब (४८)संघाला विजयपथावर घेऊन जात असताना जडेजाच्या थेट फेकीवर तो धावबाद होताच आॅस्ट्रेलियाचे अवसान गळाले. आॅस्ट्रेलियाला विजयासाठी ३६ चेंडूत ३८ धावांची गरज होती. कुलदीपने अ‍ॅलेक्स केरी (२२) याचा त्रिफळा उवडून विजयाच्या आशा पल्लवित केल्या. बुमराहने नाथन कुल्टर नाईल्स आणि पॅट कमिन्स यांना तर विजयने अखेरच्या षटकात अ‍ॅडम झम्पा याला बाद करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
>४० शतके ठोकणारा सर्वांत युवा फलंदाज
कोहलीने आज वन डे त ४० वे आणि एकूण ६५ वे आंतरराष्टÑीय शतक नोंदविले. ३० वर्षे १२ दिवसांच्या वयात त्याने ही कामगिरी केली असून जगातील सर्वांत युवा विक्रमवीर बनला. तेंडुलकरने ४० वे शतक गाठले त्यावेळी त्याचे वय ३३ वर्षे १४२ दिवस इतके होते. सचिनने ही कामगिरी ३५५ व्या तर विराटने २१६ व्या डावात केली. आॅस्ट्रेलियाविरुद्ध विराटचे हे सातवे शतक आहे.याशिवाय श्रीलंकेविरुद्ध आठ, वेस्ट इंडिजविरुद्ध सात, न्यूझीलंड पाच, द. आफ्रिका चार, इंग्लंड आणि बांगला देशविरुद्ध प्रत्येकी तीन, पाकिस्तानविरुद्ध दोन तसेच झिम्बाब्वेविरुद्ध एक शतक ठोकले आहे.

तीन संघांविरुद्ध प्रत्येकी सात षटके ठोकणारा विराट जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने सर्वात जलद नऊ हजार धावांचा टप्पा गाठणारा खेळाडू ठरला आहे. कर्णधार म्हणून आपल्या १५९ व्या डावात विराटने ही कामगिरी केली आहे.
>धावफलक
भारत :रोहित शर्मा झे. झम्पा गो. कमिन्स ००, शिखर धवन पायचित गो. मॅक्सवेल २१, विराट कोहली झे. स्टोयनिस गो. कमिन्स ११६, अंबाती रायुडू पायचित गो. लियोन १८, विजय शंकर धावबाद (झम्पा)४६, केदार जाधव झे. फिंच गो. झम्पा ११, महेंद्रसिंग धोनी झे. ख्वाजा गो. झम्पा ००, रवींद्र जडेजा झे.ख्वाजा गो.कमिन्स २१, कुलदीप यादव त्रि. गो. कमिन्स ३, मोहम्मद शमी नाबाद २, जसप्रीत बुमराह त्रि. गो.कुल्टर नाईल ००, अवांतर १२, एकूण: ४८.२ षटकात सर्वबाद २५०. गोलंदाजी : पॅट कमिन्स ९-२-२९-४,नाथन कुल्टर नाईल ८.२-०-५२-१,ग्लेन मॅक्सवेल १०-०-४५-१,अ‍ॅडम झम्पा १०-०-६२-२,नाथन लियोन १०-०-४२-१,मार्कस्टोयनिस १-०-१२-०.
आॅस्ट्रेलिया: अ‍ॅरोन फिंच पायचित गो. कुलदीप ३७, उस्मान ख्वाजा झे. कोहली गो. केदार ३८, शॉन मार्श झे. धोनी गो. जडेजा १६, पीटर हॅन्डसकोम्ब धावबाद (जडेजा)४८, ग्लेन मॅक्सवेल त्रि. गो. कुलदीप ४, मार्कस् स्टोयनिस पायचित गो. शंकर ५२, अ‍ॅलेक्स केरी त्रि. गो. कुलदीप २२, नाथन कुल्टर नाईल त्रि. गो. बुमराह ४, कमिन्स झे. धोनी गो. बुमराह ००, नाथन लियोन नाबाद ६ अ‍ॅडम झम्पाा त्रि. गो. शंकर २ अवांतर: १३ एकूण: ४९.३ षटकात सर्वबाद २४२. गोलंदाजी: मोहम्मद शमी १०-०-६०-० जससप्रीत बुमराह १०-०-२९-२, रवींद्र जडेजा १०-०-४८-१ विजय शंकर १.३-०-१५-२ कुलदीप यादव १०-०-५४-३ केदार जाधव ८-०-३३-१.

Web Title: In Nagpur, the winning series continued, winning the second match took 2-0 lead in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.