NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल

OMA vs NAM LIVE Score, T20 World Cup 2024 : नामिबिया आणि ओमान यांच्यातील सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 09:20 AM2024-06-03T09:20:50+5:302024-06-03T09:24:11+5:30

whatsapp join usJoin us
NAM vs OMA WHAT A MATCH Oman vs namibia, results in Super Over | NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल

NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

NAM vs OMA Live : विश्वचषकातील तिसरा सामना अनिर्णित संपला. ब गटातील हा पहिलाच सामना आहे. नाणेफेक जिंकून नामिबियाने ओमानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सुरुवातीपासूनच संघर्ष करत असलेल्या ओमानच्या संघाला निर्धारित २० षटके देखील खेळता आली नाहीत आणि संघ १९.४ षटकांत अवघ्या १०९ धावांवर गारद झाला. जीशान मकसूद (२२) आणि खालिल कैल (३४) वगळता एकाही ओमानच्या फलंदाजाला २० हून अधिक धावा करता आल्या नाहीत. नामिबियाकडून रूबेन ट्रम्बेलमॅनने सर्वाधिक चार बळी घेऊन कमाल केली. लक्ष्य छोटे होते पण ओमानच्या संघाने दिलेली कडवी झुंज पाहण्याजोगी होती. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात कोणालाच विजय मिळवला आला नाही. 

नामिबियाच्या घातक गोलंदाजीसमोर ओमानच्या कोणत्याच फलंदाजाचा टिकाव लागत नव्हता. संघाचे खातेही उघडले नसताना ओमानला पहिला झटका बसला. मग बळींची जणू काही मालिकाच सुरू झाली. नामिबियाकडून रूबेन ट्रम्बेलमॅन (४), डेव्हिड व्हिसे (३), कर्णधार गेरहार्ड इरास्मस (२) आणि बर्नार्ड स्कोल्टजने (१) बळी घेतला. 

ओमानने दिलेल्या ११० धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाला देखील सुरुवातीला एक मोठा झटका बसला. सलामीवीर मायकल वॅन लिंगेन खाते न उघडता तंबूत परतला. मग निकोलस डेव्हिनने (२४) धावा करून मोर्चा सांभाळला, तो बाद होताच डान फ्रायलिंकने (४५) सावध खेळी करताना नामिबियाला विजयाच्या दिशेने नेले. पण, अखेरच्या षटकांत ५ धावांची गरज असताना नामिबियाला अपयश आले अन् सामना अनिर्णित राहिला.

अखेरच्या षटकापर्यंत थरार

अखेरच्या षटकातील ४ चेंडूत नामिबियाला विजयासाठी ५ धावांची आवश्यकता होती. अखेरच्या षटकांतील तिसरा चेंडू निर्धाव (जेन ग्रीन बाद) गेल्यानंतर ३ चेंडूत ५ धावा हव्या होत्या. चौथ्या चेंडूवर एक धाव मिळाल्याने डेव्हिड व्हिसाला स्ट्राईक मिळाले. आता २ चेंडूत ४ धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर २ धावा काढण्यात नामिबियाला यश आले. दुसऱ्या टोकाला असलेल्या स्टम्पमुळे ओमानच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. कारण चेंडू स्टम्पला लागल्याने चौकार गेला नाही. अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना चेंडू निर्धाव गेला आणि यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे नामिबियाने एक धाव काढून सामना बरोबरीत संपवला. 

ओमानचा संघ - 
आकिब इलियास (कर्णधार), कश्यप प्रजापती, नसीम खुशी, जीशान मकसूद, खालिद कैल, अयान खान, मोहम्मद नदीम, मेहरान खान, शकील अहमद, कलीमुल्लाह, बिलाल खान. 

नामिबियाचा संघ -
गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), मायकल वॅन लिंगेन, निकोलस डेव्हिन, डान फ्रायलिंक, मालन क्रूगर, जेजे स्मिट, डेव्हिड व्हिसे, जेन ग्रीन, रूबेन ट्रम्बेलमॅन, बर्नार्ड स्कोल्टज आणि टँगेनी लुंगामेनी. 

Web Title: NAM vs OMA WHAT A MATCH Oman vs namibia, results in Super Over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.