नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणचे (साई) नाव बदलण्याचे संकेत देताना रविवारी सध्याच्या काळात खेळामध्ये ‘प्राधिकरण’ शब्द ठेवण्यास कुठलेही औचित्य नसल्याचे म्हटले आहे.
राठोड यांनी साईमध्ये बदल करण्याचे संकेत देताना टिष्ट्वट केले, ‘चांगली सुविधा देण्यासाठी ‘भारतीय क्रीडा प्राधिकरण’मध्ये आजच्या स्थितीत ‘प्राधिकरण’ या शब्दाला अर्थ नाही. त्यामुळे भारतीय खेळ आणि साईमध्ये बदल करण्यात येईल.’ जीवन जगण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या खेळाडूंना मदत करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी टिष्ट्वट केले, ‘खेळातील आमचे ‘हिरो’ असलेल्यांना जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही दु:खद बाब आहे. आमच्या खेळाडूंना मदत करण्यासाठी तुम्हाला काय वाटते, याबाबत आम्हाला कळवा. क्रीडा मंत्रालय खेळाडूंना आदर व सुविधा देण्याच्या लक्ष्यापासून विचलित होणार नाही.’ (वृत्तसंस्था)
Web Title: The name of the sports minister changing the name of 'sai'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.