मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) काही दिवसांपूर्वी निवड समिती सदस्यांसाठी अर्ज मागवले होते. या अर्जांमधून काही नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली असून काही संभाव्य सदस्यांनी नावं जाहीर करण्यात आली आहेत. आता या संभाव्य निवड समितीमध्ये कशी स्पर्धा रंगते, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
गेल्या निवड समितीमधील अध्यक्ष एम एसके प्रसाद आणि गगन खोडा या दोघांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यामुळे बीसीसीआयने या दोन पदांसाठी अर्ज मागवले होते. त्यावेळी काही जणांनी या पदांसाठी अर्ज केले होते. आता ज्या माजी क्रिकेटपटूंची या पदांसाठी निवड होईल, त्यामधून एका व्यक्तीला समितीचे अध्यक्षपदही दिले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. कारण सध्याच्या घडीला निवड समितीचे अध्यक्षपद कोणाही सदस्याकडे नाही.
या संभाव्य निवड समिती सदस्यांची मुलाखत क्रिकेट सल्लागार समिती घेणार आहे. या समितीमध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल, आरपी सिंग आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे. संभाव्य निवड समितीमध्ये नेमके कोणते खेळाडू आहे, याची उत्सुकता तुम्हाला असेल. या संभाव्य निवड समिती सदस्यांमध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद, अजित आगरकर, राजेश चौहान यांचा समावेश असल्याचे समजत आहे.
ऐकावं ते नवलंच; शिवरामकृष्णन यांचा निवड समिती प्रमुख पदासाठीचा अर्जच 'गायब'
भारताचे माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी टीम इंडियाच्या निवड समिती प्रमुख पदासाठी केलेला अर्जाचा मेल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) इनबॉक्समधून गायब झाल्याची बाबत समोर आली आहे. भारताचे माजी फिरकीपटू शिवरामकृष्णन यांनी ई मेलद्वारे त्यांचा CV बीसीसीआयला पाठवला होता. निवड समिती प्रमुखपदासाठी अर्जाची मुदत संपायच्या 48 तास आधी शिवरामकृष्णन यांनी हा मेल वाठवला होता, परंतु तो आता बीसीसीआयच्या इनबॉक्समधून गायब झाला आहे.
टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकानं दिलेल्या वृत्तानुसार निवड समिती प्रमुखाच्या पदासाठी शिवरामकृष्णन यांनी त्यांची संपूर्ण माहिती असलेला CV पाठवला होता, परंतु त्यांचा हा अर्ज बीसीसीआयला मिळालाच नाही. काहींच्या मते त्यांना शिवरामकृष्णन यांचा मेल मिळालाच नाही, तर काहींनी तो डिलीट करण्यात आला असावा, अशी शंका उपस्थित केली आहे. शिवरामकृष्णन यांनी दोन दिवसांपूर्वी मेल केल्याचे सांगितले.
'' बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवरील लिंकवर शिवरामकृष्णन यांचा अर्ज आल्याचे दिसत होते. त्यामुळे या पदाच्या शर्यतीतून त्यांना बाद करण्याचा प्रश्नच येत नाही. शिवा यांनी 22 जानेवारीला सायंकाळी 4.16 मिनिटांनी मेल पाठवला आणि 24 जानेवारी ही अंतिम तारीख होती. CV साठी नवीन ई मेल अॅड्रेस तयार करण्यात आला होता. त्यात 21 अर्ज आले आहेत. म्हणजे 21 ई मेल असायलाच हवेत,'' असे सूत्रांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की,''एकच मेल कसा गायब होऊ शकतो? जेव्हा त्या व्यक्तीनं अधिकृत लिंकवरून तो पाठवला होता. तो मेल स्पॅममध्येही कसा दिसत नाही?'' या संदर्भात बीसीसीआय त्यांच्या तांत्रिक विभागाशी चर्चा करत आहे. एमएसके प्रसाद यांच्या जागी शिवरामकृष्णन यांचे नाव निश्चित मानले जात आहे. त्यांच्याकडे प्रशिक्षणाचा अनुभव आहे.
Web Title: Names of probable selection committee members of Indian cricket to be announced, see who will be contesting
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.