Join us  

Narendra Modi And Team India : बुमराहची पत्नी, लेक अन् पंतप्रधान मोदी; संजना गणेसनची भारी पोस्ट

Team India Arrival : विश्वविजेत्या टीम इंडियाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 3:17 PM

Open in App

Team India Return : मायदेशात परतताच भारतीय संघाच्या शिलेदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर सर्वच खेळाडू पंतप्रधानांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी मोदींना नमो नावाची जर्सी भेट दिली. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ विजेत्या भारतीय संघाने आज पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांची भेट घेतली. टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी रोहितसेनेचे कौतुक केले. भारतीय संघाने बार्बाडोसच्या धरतीवर विश्वचषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. गुरुवारी सकाळी टीम इंडिया राजधानी दिल्लीत पोहोचली. आज संध्याकाळी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर येईल. इथे खेळाडूंच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडेल. याशिवाय सायंकाळी ५ वाजल्यापासून मरीन ड्राईव्हवर विजय यात्रा आणि वानखेडेवर महोत्सव साजरा केला जाणार आहे. 

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेसनने देखील मोदींसोबतचा फोटो शेअर केला आहे. "अभुतपूर्व सकाळ", अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे. फोटोमध्ये पाहायला मिळते की, मोदी बुमराहचा लेक अंगदची विचारपूस करत आहेत. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय संघातील शिलेदारांचा व्हिडीओ समोर आला आहे. मोदी खेळाडूंशी संवाद साधताना दिसत आहेत. मात्र, ट्रॉफीसोबत फोटो काढताना नरेंद्र मोदींनी ट्रॉफी न धरता कर्णधार रोहित शर्मा आणि मावळते प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा हात धरला. मोदींची ही कृती सर्वांचे लक्ष वेधत आहे. 

विश्वविजेत्यांचा जल्लोष 

मुंबई क्रिकेट असोसिएशनने चाहत्यांना खुशखबर दिली. खरे तर वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांना मोफत एन्ट्री मिळणार आहे. गेट नंबर २, ३ आणि ४ मधून दुपारी चार वाजल्यापासून चाहत्यांना वानखेडेमध्ये प्रवेश मिळेल. टीम इंडियाची आज सायंकाळी मुंबईत विजयी परेड होणार आहे. याआधी भारतीय संघाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारतीय क्रिकेट संघाने ७, लोककल्याण मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. २९ जून रोजी बार्बाडोस येथे ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचली.

टॅग्स :जसप्रित बुमराहसंजना गणेशननरेंद्र मोदीट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघ