India vs Pakistan : 'या परिस्थितीला नरेंद्र मोदीच जबाबदार'; पाकिस्तानी दिग्गज क्रिकेटपटूचे गंभीर आरोप

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या खिलाडूवृत्तीवर पाकिस्तानी चाहते आणि आजी-माजी क्रिकेटपटू सवाल उपस्थित करताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 12:57 PM2022-11-03T12:57:14+5:302022-11-03T12:58:19+5:30

whatsapp join usJoin us
Narendra Modi is the biggest problem for cricket between India and Pakistan, Javed Miandad  | India vs Pakistan : 'या परिस्थितीला नरेंद्र मोदीच जबाबदार'; पाकिस्तानी दिग्गज क्रिकेटपटूचे गंभीर आरोप

India vs Pakistan : 'या परिस्थितीला नरेंद्र मोदीच जबाबदार'; पाकिस्तानी दिग्गज क्रिकेटपटूचे गंभीर आरोप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या खिलाडूवृत्तीवर पाकिस्तानी चाहते आणि आजी-माजी क्रिकेटपटू सवाल उपस्थित करताना दिसत आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील No Ball असो किंवा कालच्या बांगलादेशविरुद्धच्या लढतीतील विराट कोहलीची Fake Fielding... यावरून ICC कशी बीसीसीआयच्या दबावाखाली काम करतेय, असा आरोप होतोय. त्यात आता भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यात क्रिकेट सामने होत नाहीत यामागे मुळ समस्या हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) असल्याचा आरोप केला आहे. 

भारत टेबल टॉपर! रोहित अँड कंपनीला रोखण्यासाठी पाकिस्तान रडीचा डाव खेळणार


भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड स्पर्धेत पाकिस्तानवर रोमहर्षक विजयाची नोंद करून स्पर्धेतील बाबर आजम अँड टीमचा मार्ग खडतर केला. त्यानंतर झिम्बाब्वेसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध अतिआत्मविश्वास पाकिस्तानला नडला आणि १ धावेने त्यांना हार मानावी लागली. आता वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताची घोडदौड पाहून पाकिस्तानच्या माजी खेळाडूंची पोटदुखी वाढली आहे आणि त्यांच्याकडून गंभीर आरोप केले जात आहेत.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनीही टीका केली आहे. ते म्हणाले, केवळ आणि केवळ पैसा असल्यामुळे BCCI ची जागतिक क्रिकेटवर मक्तेदारी आहे, परंतु पैसाच सर्वकाही नसतं. आयसीसीने नियमाची अंमलबजावणी करताना पैशांसाठी कुणालाही झुकतं माप देऊ नये. India vs Pakistan यांच्यातल्या मालिका न होण्यामागे केवळ नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. तेच मुळ समस्या आहेत.

पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या अंधुक आशा
दक्षिण आफ्रिका ३ सामन्यांत ५ गुणांची कमाई करून दुसऱ्या स्थानावर आहेत आणि त्यांच्यासमोर पाकिस्तान व नेदरलँड्सचे आव्हान आहे. यापैकी एक सामना जिंकून ते उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करू शकतील. पाकिस्तान ( २), बांगलादेश ( १) यांच्या लढती काही अंशी गुणतालिकेत बदल करू शकतील. पाकिस्तानच्या दोन लढती शिल्लक आहेत आणि त्यांना दक्षिण आफ्रिका व बांगलादेशचा सामना करायचा आहे. आफ्रिकेला दोन लढतीत नेदरलँड्स व पाकिस्तानचा सामना करायचा आहे. आफ्रिकेने नेदरलँड्सला पराभूत केल्यास त्यांचे ७ गुण होती आणि ते उपांत्य फेरीत जातील, परंतु भारत दुसऱ्या क्रमांकावर येईल.   

Web Title: Narendra Modi is the biggest problem for cricket between India and Pakistan, Javed Miandad 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.