मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला गर्विष्ठ म्हणून संबोधणे ज्येष्ठ अभिनेते नसरूद्दीन शाह यांना महागात पडले आहे. कोहलीवर केलेल्या टीकेचा नेटीझन्सने चांगलाच समाचार घेतला आहे आणि नसीरूद्दीन यांना उपदेशाचे डोसही दिले आहेत.
शाह यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, कोहली हा फक्त जगातील सर्वोत्तम फलंदाज नाही, तर जगातील सर्वांत गर्विष्ठ खेळाडू आहे. त्याची क्रिकेटमधील क्षमता त्याच्या अहंकार आणि उद्धट व्यवहारासमोर खुजा ठरतो. माझा देश सोडण्याचा कोणताही हेतू नाही, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुसऱ्या कसोटीत कोहलीने प्रतिस्पर्धी खेळाडूंना डिवचण्याची एकही संधी दवडली नाही. त्याने सातत्याने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची स्लेजिंग केली. पंचांनीही त्याला ताकीद दिली. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना तोडीसतोड उत्तर द्यायलाच हवे आणि कोहली तेच करतोय, अशी काही चाहत्यांनी पाठराखण केली. म्हणून नसीरूद्दीन यांच्या टीकेनंतर नेटीझन्सने त्यांना उपदेश देण्यास सुरुवात केली.
Web Title: Naseeruddin Shah, who called Virat Kohli 'arrogant'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.